राणेंचा शिवसेनेला जोरदार धक्का : पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजपत प्रवेश

या पक्ष प्रवेशासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
राणेंचा शिवसेनेला जोरदार धक्का : पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजपत प्रवेश
Shivsena Panchayat Samiti members join BJPSarkarnama

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळाच्या उद्‌घाटनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल सिंधुदुर्गमध्ये होते. त्यांची पाठ फिरताच भारतीय जनता पक्षाने विशेषतः राणे कुटुंबीयाने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेच्या कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापतीसह तीन विद्यमान सदस्यांनी आज (ता. १० आक्टोबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Three Shiv Sena members of Kudal Panchayat Samiti join BJP)

माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या पक्ष प्रवेशासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. एकंदरीतच काल विमानतळाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात रंगलेला श्रेयवादाचा पुढचा सामना आज पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने पहायला मिळाला. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे विद्यमान पदाधिकारी भाजपत दाखल झाल्यामुळे कुडाळमध्ये शह-कटशहाचे राजकारण पुढील काळात रंगण्याची चिन्हे आहेत.

Shivsena Panchayat Samiti members join BJP
‘सरकारी पाहुणे’ शोध मोहिमेत व्यस्त अन्‌ अजितदादांच्या कारखान्याचा गाळप हंगाम दणक्यात सुरू

पावशी पंचायत समिती मतदारसंघातून माजी सभापती राजन जाधव, पाट पंचायत समिती मतदारसंघातून डॉ. सुबोध माधव, वालावल पंचायत समिती मतदारसंघातून प्राजक्ता प्रभू यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. त्यांनी रविवारी दुपारी हा प्रवेश नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओमगणेश बंगल्यावर माजी खासदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. भाजप युवा नेते विशाल परब यांनी हा शिवसेनेला धक्का दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Shivsena Panchayat Samiti members join BJP
शरद पवारांनी लक्ष घालताच राष्ट्रवादीतील पदाधिकारी बदलास स्थगिती

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अतुल काळसेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कुडाळचे सभापती नूतन आईर, आनंद शिरवलकर, सभापती अंकुश जाधव, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, भाजप युवा मोर्चा कुडाळ तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, नागेश आईर, आनंद शिरवलकर, माजी नगरसेविका साक्षी सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्या तवटे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.