त्या अधिकाऱ्यांने शिवसेनेची प्रायव्हेट कंपनी असल्यासारखी महापालिका चालवली...

मालवण Malvan शहरात City पाणी शिरलंय Flooded, स्ट्रीटलाईट Street Light Problem नाही, अग्निशामकची गाडी भ्रष्टाचार करून खरेदी केलेली आहे. हे सर्व त्यांना विचारायचे नाही का, असा प्रश्न निलेश राणे Nilesh Rane यांनी केला.
BJP Leader Nilesh Rane
BJP Leader Nilesh Ranesarkarnama

सिंधुदुर्ग : एखाद्या अधिकाऱ्यांला चांगले बोलून समजत नसेल तर त्याला दुसरी कोणती भाषा वापरायची. मी त्यांना आरेरावीची भाषा केलेली नाही की धमकीही दिलेली नाही. तो अधिकारी खूर्चीवर बसल्यापासून त्याने शिवसेनेची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी महानगरपालिका चालवली. भ्रष्टाचार करून अमाप पैसा कमविला, मग आम्ही गप्प बसायचे का, असा प्रश्न भाजपचे नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला.

मालवण महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दमबाजीच्या भाषेत बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याविषयी निलेश राणेंची नेमकी भूमिका एका वृत्तवाहिनीने जाणून घेतली. निलेश राणे म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्याला चांगले बोलून समजत नसेल, तर त्याला दुसरी कोणती भाषा वापरायची. त्यांना मी कोणतीही आरेरावीची भाषा केलेली नाही किंवा धमकी दिलेली नाही. शिवीगाळ केलेली नाही तसेच त्यांच्या अंगावर गेलेलो नाही.

BJP Leader Nilesh Rane
केसरकर आता 'विश्वप्रवक्ता' असल्यासारखेच वागताहेत....निलेश राणे

सहा आठ महिन्यापूर्वी आम्ही त्यांना भेटून काही सूचना केल्या होत्या. मालवण शहराची त्यांनी वाट का लावली, हा माझा विषय होता. भ्रष्टाचाराचा विषय होता. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती. ज्यावेळेपासून तो अधिकारी खूर्चीवर बसला आहे. त्यावेळीपासून त्या अधिकाऱ्याने शिवसेनेची प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखी महानगरपालिका चालवली. अमाप पैसा छापला. अशा माणसाला विचाराचे नाही का. त्याला झापला कारण तो पैसे खात होता, आजही खातोय.

BJP Leader Nilesh Rane
शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हावे!

अधिकाऱ्याला महाराष्ट्राचे टोक दाखविणार असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर निलेश राणे म्हणाले, तो ज्या ठिकाणी जाईल तेथे ताो तेच करणार आहे. अशा शासकिय अधिकाऱ्याला कशाचाही धाक नसावी. तो आपल्या खोलीत बसून वाटेल ते करू लागला तर चालेल का. आम्ही त्यांना जनतेच्या विषयासाठी जाब विचारणारच. शासकिय अधिकाऱ्यांचा आम्ही रिस्पेक्ट करतो. एखादाच अधिकारी असा असतो. मालवण शहरात पाणी शिरलंय, स्ट्रीट लाईट नाही, अग्निशामकची गाडी भ्रष्टाचार करून खरेदी केलेली आहे. हे सर्व त्यांना विचारायचे नाही का, असा प्रश्न श्री. राणे यांनी केला.

BJP Leader Nilesh Rane
राज ठाकरेंच्या मुलाला मंत्रिपद मिळणार? शिंदे गट-भाजप धक्का देण्याच्या तयारीत

केवळ राणे कुटुंबाबाबतच असे का होतंय, या प्रश्नावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला राणेच दिसतात. बच्चू कडू काय करतात, कुठली भाषा वापरता ते दिसत नाही. मग, आमची संस्कृती काढली जाते. हे सर्व आम्ही जनतेसाठी भांडतोय, आठ महिन्यापूर्वी या माणसाला सांगितले होते, तुम्ही जनतेचे आहात. भ्रष्टाचार चालणार नाही. त्यामुळे त्यांना कळतंय त्या भाषेतच आम्ही त्यांना विचारणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com