राईट हॅंड म्हणवणाऱ्या महेश पाटलांनी या कारणांमुळे सोडली भाजप आमदार चव्हाणांची साथ

कल्याण डोंबिवलीतील भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
BJP corporators join Shiv Sena
BJP corporators join Shiv SenaSarkarnama

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाच्या तीन नगरसेवकांनी सोमवारी (ता. २२ नोव्हेंंबर) पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याची दखल संपूर्ण राज्यातील मीडियाने घेतली. मात्र, भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या महेश पाटील यांचे पक्षांतर चर्चेचा विषय ठरले आहे. मध्यंतरी पक्षातील पदाधिकारी आणि पाटील यांच्यात बेबनाव झाला. महेश पाटील यांना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा न दिल्याने ते नाराज झाले होते, तेव्हाच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. (These reasons Mahesh Patil leave BJP MLA Ravindra Chavan's and joined Shiv Sena)

कल्याण-डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार असून, प्रभागांची संख्या १२२ वरून १३३ वर जाणार आहे. प्रभागांची वाढती संख्या पाहता कल्याण-डोंबिवलीत एकहाती सत्ता आणण्यासाठी साधारण ७० हून अधिक नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. कल्याण व कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व असले तरी तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपचीदेखील फळी चांगली आहे. डोंबिवली हा तर भाजपचा बालेकिल्ला आहे, हे लक्षात घेऊन शिवसेनेने मनसे-भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मनसे, भाजपपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांनाही शिवसेना गळाला लावत आहे. दिवाळीच्या बहाण्याने आजही शिवसेना नेते अनेकांची भेट घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

BJP corporators join Shiv Sena
शशिकांत शिंदेंना धूळ चारणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत भाजपने इतर पक्षांचे नगरसेवक फोडून त्यांचा भाजपमध्ये आणत आपले पक्षीय बलाबल वाढविले होते. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. त्यातच यंदा प्रथमच पालिकेच्या पॅनेल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी व एकहाती सत्तेसाठी शिवसेनेने आता सर्व पक्षांना लक्ष्य करीत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. मनसेतील महत्वाचा चेहरा, पक्षाचा आवाज म्हणून ओळख असणारे राजेश कदम यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या कदम यांच्या जाण्याने मनसेची काही प्रमाणात हानी झाली आहे.

BJP corporators join Shiv Sena
शशिकांत शिंदेंच्या पराभवावर अजित पवारांचे भाष्य...

शिवसेनेने भाजपचे महेश पाटील यांचा सोमवारी पक्षप्रवेश करून घेतला आहे. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचे पाटील हे उजवे हात समजले जात होते. मात्र, मध्यंतरी पक्षातील पदाधिकारी आणि पाटील यांच्यात बेबनाव झाला. महेश पाटील यांना पाठिंबा न दिल्याने ते नाराज झाले होते. तेव्हाच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, कोरोनामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला होता. महेश पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे भाऊ चौधरी हे उभे होते. भाऊ यांचा अगदी थोड्या फरकाने पराभव झाला होता. निवडून आल्यावर महेश पाटील यांनी कल्याण ग्रामीणमध्ये आपला चांगला वचक निर्माण केला आहे. ज्याचा फायदा आता शिवसेनेला होऊ शकतो. याबरोबरच २०१५ ला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नगरसेवकही सेनेच्या संपर्कात आहेत.

BJP corporators join Shiv Sena
अजितदादा कोकणच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीला मोठा झटका

आगामी कल्याण डोंबिवली निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता आणण्यासाठी साधारण ७० च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणे आवश्यक आहे. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाला शह देण्यासाठी आमदारांचे निकटवर्तीय समजले जाणारे पाटील यांनाच शिवसेनेने फोडले आहे. त्यांच्यामार्फत आता आणखी काही नगरसेवकांची मनधरणी शिवसेना करणार आहे. भाजपविरोधी पक्ष म्हणून सक्रिय होत असताना मनसे बॅकफूटवर जात असल्याचे दिसते. मनसेतील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातही शिवसेना आहे. दिवाळीत खास फराळाच्या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसे, भाजप, काँग्रेसमधील अनेकांची भेट घेतली असून आता कोण कोण शिवसेनेच्या गळाला लागते, हे लवकर स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com