Uddhav Thackeray News : ठाकरेंनी डाव टाकला; कदम पिता पुत्रांची कोंडी; मोठा नेता करणार घरवापसी?

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी कोकणात विशेष लक्ष दिले आहे.
Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Yogesh Kadam
Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Yogesh Kadam Sarkarnama

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला कोकणात मोठा फटका बसला आहे. कोकणातील सहा आमदार शिंदेंसोबत गेले आहे. त्यामुळे कोकणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अधील लक्ष दिले दिले आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात त्यांनी शिवसेनेतील पुन्हा जुन्या नेत्यांना कामाला लावले आहे.

त्यातच माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) यांना घेरण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दापोली (Dapoli) मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलणार आहेत?

Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Yogesh Kadam
Nashik Graduate Constituency Election : खडसे अॅक्शन मोडवर : नाशिक पदवीधरची गणितं बदलणार?

दापोली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे गेल्या वेळी कदम निवडून आले आहेत. मात्र, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना आव्हान देणारा तगडा चेहरा ठाकरेंनी शोधून काढला आहे. त्यासाठी माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

संजय कदम हे शिवसेनेचे नेते होते. मात्र, त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते आमदार झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव केला होता. आता त्यांची ठाकरे गटात घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, या चर्चांवर योगेश कदम म्हणाले, 'संजय कदम यांनी भगवा जाळून बाळासाहेबांचे पोस्टर्स फाडून जाळले होते. अशा व्यक्तीला ठाकरे स्वीकारायला तयार होतात, असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय कदम शिवसेनेत गेले, तर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, असा टोलाही माध्यमांशी बोलताना लगावला.

Uddhav Thackeray, Ramdas Kadam, Yogesh Kadam
Chinchwad-Kasaba By Election News : चिंचवड राष्ट्रवादी लढणार, कसब्यावरही दावा

'ते शिवसेनेत जाणार असतील तर ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ते ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश करतील त्या दिवशी मी निवांत झोपेन, असेही योगेश कमद म्हणाले. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीवेळीच संजय कदम यांचा प्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात येणार होते, असा गोफ्यस्पोट त्यांनी केला. अनिल परब त्यांना 'मातोश्री'वर घेऊन गेले होते. ही बाब खासदार संजय राऊत यांनीच मला सांगितली होती, असेही योगेश कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in