Uddhav Thackeray News : आगामी निवडणुका ठाकरे गट राष्ट्रवादीच्या 'घड्याळ' चिन्हावर लढणार...; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Maharashtra Political News : '' उद्धव ठाकरे यांना एका वर्षात पुन्हा पक्ष बांधणी शक्य नाही. कारण...''
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Sindhudurg : लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नसतानाच पुणे मतदारसंघावरील दावे प्रतिदावे यांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेवर जागा दावा केला आहे. त्यानंतर काँग्रेसनं त्यांना प्रत्युत्तर देतानाच पुण्याच्या जागा आम्हीच लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. याचदरम्यान, आता ठाकरे गट आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील असं खळबळजनक विधान भाजप नेत्यानं केलं आहे.

भाजप नेते व आमदार नितेश राणे(Nitesh Rane) ठाकरे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राणे यांनी सोमवारी(दि.२९) सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी दोनवेळा दिल्याचा धक्कादायक दावा राणे यांनी केला आहे. यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
Satara News : दहा वेळा शडू ठोकायची माझी तयारी आहे : शंभूराज देसाईंचे अजितदादांना प्रतिउत्तर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार, आमदार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तसा प्रस्ताव खासदार संजय राऊत स्वतः दोनवेळा घेऊन गेले आहेत. हे खरं की खोटं आता राऊतांनीच सांगावं. पण आगामी काळातील निवडणुका ठाकरे गट घड्याळ या चिन्हावर लढणार असून त्याची तयारी त्यांनी आता करावी. मशाल हे चिन्ह देखील राहणार नाही. संपूर्ण पक्ष राष्ट्रवादी(NCP)त विलीन होत आहे. तशी तयारी संजय राऊतांनी केली असल्याचं विधानही राणेंनी केलं आहे.

नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना एका वर्षात पुन्हा पक्ष बांधणी शक्य नाही. कारण तो त्यांचा पिंड नाही. त्यांना निवडणुकीसाठी चिन्हं भेटणार नाही. म्हणून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत अशी माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. तर हाच प्रश्न संजय राऊत राष्ट्रवादीकडे घेऊन गेले आहेत. त्याबाबत त्यांनी बोलावं असंही आव्हान करतानाच जागावाटप करण्याची नाटकं सोडून खरी माहिती त्यांनी सर्वांना द्यावी असं आव्हान राणे यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray
Girish Mahajan News : महाजनांनी ठेवलं खडसेंच्या मर्मावर बोट; म्हणाले, "खडसेंचे जावई अडीच वर्षांपासून..."

पुणे लोकसभेवर राऊतांचं टि्वट...

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी महाविकास आघाडीत पुणे लोकसभेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असा सल्ला संजय राऊतांनी आघाडीतील काँग्रेस , राष्ट्रवादीला दिला आहे.

राऊत म्हणाले, '' कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर 'कसबा' प्रमाणे पुणे 'लोकसभा' पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल'' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com