भाजपला धक्का : शिवसेनेला मदत करणाऱ्या बंडखोरांचे नगरसेवकपद अबाधित

कोकण विभागीय आयुक्तांनी भाजपची कारवाई करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली
BJP
BJPSarkarnama

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांचे पद रद्द करण्याची कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती. या चारही नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत पक्षादेशाचे उल्लंघन करून शिवसेनेला मदत केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. (The post of rebel BJP corporator in Mira Bhayandar remains)

दरम्यान, शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या माथेरानमधील १० नगरसेवकांना रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच अपात्र ठरविले आहे. त्यानंतर मीरा भाईंदरमध्येही भाजपला धक्का बसला आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत गीता जैन, परशुराम म्हात्रे आणि अश्विन कसोदरिया या भाजपच्या तीन नगरसेवकांनी पक्षादेशाविरोधात शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते; तर भाजपचे विजय राय निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी याचिका उपमहापौर गेहलोत यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचे आदेश कोकण भवन आयुक्तांनी जारी केले आहेत.

BJP
आमच्या बंधूराजची गाडी आज लयंच जोरात होती : बारामतीत अजितदादांची फटकेबाजी!

कोरोना काळात सुनावणी घेणे शक्य झाले नसल्याचा मुद्दा त्या वेळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने न्यायालयात मांडला होता. त्यावर न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश देऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत नगरसेवक पदाबाबत निर्णय घेण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन याचिका फेटाळण्यात येत असल्याचा निर्णय दिला आहे.

BJP
भाजपचे बाबूराव पाचर्णे शिरूरमधून लोकसभा लढणार?: कार्यकर्त्यांच्या आग्रहाला हास्यातून दाद

माथेरानचे विद्यमान उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे यांनी शिवसेनेतून भाजपत प्रवेश केला होता. त्यांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com