Ravindra Chavan News : रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे पालकमंत्र्यांचाच ताफा अडकला; अधिकारी धारेवर

Ravindra Chavan convoy Stuck : "पालकमंत्र्याची अशी अवस्था तर सामान्य नागरिकांना काय सोसावे लागत असेल? "
Ravindra Chavhan
Ravindra ChavhanSarkarnama

Sindhudurg News : पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) त्यांच्या केसरी या गावाहून सिंधुदुर्ग जिल्हा अतिवृष्टी आढावा बैठकीसाठी जात असतानाच रस्त्यावर झाड पडल्याने त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. या प्रकारामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्र्याची अशी अवस्था तर सामान्य नागरिकांना काय सोसावे लागत असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

Ravindra Chavhan
सुधीरभाऊंना 'वनवास' रवींद्र चव्हाण 'डार्क हॅार्स'

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे यंत्रणाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्यासह पदाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्या केसरी येथील निवासस्थानावावरून निघाले, मात्र केसरी ते सिंधुदुर्गनगरी रस्त्यावर सावंतवाडी तालुक्यातील कोलगावजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाही उशीरा पोहचली आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. यामुळे पालकमंत्री 15 मिनटं उशीरा बैठकीत पोहचले.

Ravindra Chavhan
Uddhav Thackeray ON Ajit Pawar : 'अजित पवारांचं 'ते' वक्तव्य अत्यंत वाईट, सगळं मिळाल्यानंतरही अन्यायाचा टाहो फोडणं.. ; ठाकरेंनी सुनावलं!

बैठकीत पोहचल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला धारेवर धरले. व्हीआयपी म्हणजे तुम्हाला काय ते कळते का? पालकमंत्र्याची अवस्था अशी असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? असे प्रश्न त्यांनी केले. बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण आक्रमक झाले होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ढिसाळपणाचा फटका लोकांना बसू नये, अशाप्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या. पालकमंत्री संतापलेले पाहून अधिकारीही हबकून गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com