Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Kokan Politics : मोठी बातमी ! राष्ट्रवादीचा बडा नेता उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर जाणर आहेत.

Kokan Politics : शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर जाणर आहेत. रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर एक माहिती समोर आली आहे. कोकणातील काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम हेदेखील या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहेत. यामुळे कोकणात ठाकरेंना बळकटी मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेमध्ये गुहागर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Uddhav Thackeray
Sandeep Deshpande Attack Update : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

खेडमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लीम समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करणारे प्रसिद्ध पत्रक ठाकूर यांनी जारी केले आहे. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला पाठिंबा द्यावा. एक लाख मुस्लीम बांधवा या सभेला उपस्थित राहतील, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर भविष्यातही आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

मुस्लिमांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे केल्यामुळे उद्धव ठाकरेंना कोकणात नव्याने बळ मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. या सभा यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक सज्ज झाले आहेत. ३० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या सभेला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com