राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; ठाण्यातील बड्या नेत्याने बांधले घड्याळ

काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे.
ncp
ncpsarkarnama

मुंबई : ठाण्यातील दिग्गज नेते सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत सुरेश म्हात्रे यांनी 'घड्याळ' हाती बांधले. अवघ्या साडेचार महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंत त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

ncp
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस आक्रमक : ही तीन नावे चर्चेत!

हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पार पडला. राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार डॉ. किरण लहामटे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी तसेच पक्षाचे इतर स्थानिक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

या वेळी पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचे कुटुंब आहे. या‌‌ कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच‌ सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा, असे आवाहन त्यांनी केले.

ncp
पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अजित पवार म्हणाले, पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करावे. पवार साहेबांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com