तटकरे भास्कर जाधवांच्या चक्रव्यूहात : आता शब्द पाळायचा की पुन्हा पुत्रप्रेम दाखवायचे?

विधान परिषदेत संधी देऊन सुनील तटकरे कुणबी समाजाला दिलेला शब्द पाळणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
तटकरे भास्कर जाधवांच्या चक्रव्यूहात : आता शब्द पाळायचा की पुन्हा पुत्रप्रेम दाखवायचे?
Sunil Tatkare-Bhaskar JadhavSarkarnama

चिपळूण : विधान परिषदेत कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. शिवसेनेकडून त्यांच्या या शब्दाचे राजकीय भांडवल करण्यास सुरुवात झाली आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शनिवारी बोलताना तटकरे यांनी कुणबी समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि विधान परिषदेची उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी माझी व शिवसेनेचे ताकद उभी करू, असे आव्हान देत तटकरेंना चक्रव्यूहात अडकवले आहे. आता तटकरे ते चक्रव्यूह कसे भेदणार आणि विधान परिषदेच्या २०२४ च्या निवडणुकीत कुणबी समाजाला संधी देणार की पुन्हा आपल्याच मुलाला आमदार करणार, याकडे कोकणवाशियांचे लक्ष लागून राहिले आहे. (Will Sunil Tatkare keep his word to the Kunbi community by giving a chance in the Legislative Council?)

खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. या भागातील कुणबी समाजाला त्यांनी टार्गेट केले आहे. ते करताना त्यांनी कुणबी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरून तटकरेंना मात्र शब्दात पकडण्याची खेळी शिवसेनेकडून सुरू झाली आहे.

Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
बाहेरून येऊन अमरावतीला भडकावू नका, ठाकूरांचा फडणवीसांवर पलटवार

इतर राजकीय नेत्यांप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या घरातील सदस्यांना राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे भाऊ अनिल तटकरे विधान परिषदेवर सदस्य होते. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून राजीव साबळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. पण त्यांना डावलून अवधूत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे साबळे यांनी पक्ष सोडला. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पक्षातील ज्येष्ठ महिलांना डावलत तटकरेंनी मुलगी आदिती तटकरेंना अध्यक्षपदी बसविले. रोहा शहराच्या नगराध्यक्षपदासाठी समीर शेडगे आणि संदीप तटकरे इच्छूक होते. त्यांना डावलून तटकरे यांनी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्ष केले.

Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
खासदार बापट यांची आदळआपट कशासाठी ?

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाचे दत्ताजी मसूरकर इच्छूक होते. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी मसूरकर यांना डावलून तटकरे यांनी त्यांचा मुलगा अनिकेतला उमेदवारी मिळवून दिली. तटकरे लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मुलगी आदितीला निवडून आणले. सद्यस्थितीत सुनील तटकरे खासदार, मुलगी राज्यमंत्री आणि मुलगा आमदार अशी तीन पदे तटकरे यांच्या घरात आहेत.

Sunil Tatkare-Bhaskar Jadhav
राणेंचा सुपडा साफ ; उदय सामंतांनी बाजी मारली, सहकार पॅनल विजयी

तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदार संघात रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग येतो. या भागात कुणबी समाजाची मते निर्णायक ठरतात. माजी खासदार अनंत गीते कुणबी समाजाच्या बळावर कोकणातून सहा वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत, त्यामुळे कुणबी समाजाला राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी तटकरेंनी समाजातील नेत्यांना विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर या प्रवेशाला कोणीही महत्व दिले नाही. मात्र, कुणबी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळवून देतो, असा शब्द तटकरेंनी दिल्यानंतर शिवसेनेने तटकरेंना शब्दात पकडण्यास सुरुवात केली आहे. तटकरेंनी कुणबी समाजाला विधान परिषदेची जागा दिल्यास शिवसेना आणि माझी ताकद कुणबी समाजाच्या उमेदवारामागे उभे करत सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांनी दिले. शिवसेना कुणबी समाजाबरोबर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आमदार जाधव यांनी केला. आमदार जाधव आणि खासदार तटकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. तटकरे यांना सहकार्य करण्याचे आश्वासन जाधवांनी दिले, त्याचा राजकीय अर्थ लोक समजून घेत आहेत.

राष्ट्रवादीने कितीही फोडाफोडी केली तरी शिवसेनेवर त्याचा काहीही फरक पडत नाही. जे लोक जॅकेट घालून मिरवतात अशाच लोकांनी पक्ष सोडला आहे. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कधीच रस्त्यावर दिसले नाहीत. अशा लोकांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेना किंवा माझ्यावर त्याचा काहीच फरक पडत नाही, असे दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in