सुनील तटकरेंमुळे मी आमदार झालो : शिवसेनेच्या दळवींचा गौप्यस्फोट

रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी खासदार सुनील तटकरे यांच्या भोवती फिरत असते.
Sunil Tatkare-Mahendra Dalvi
Sunil Tatkare-Mahendra DalviSarkarnama

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यामुळे मी आमदार झालो, असे अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी नागोठणे येथील एका कार्यक्रमात खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत सांगितले. (Sunil Tatkare made me an MLA: Mahendra Dalvi)

दरम्यान, दळवी यांना आमदार करण्यात माझा कोणताही वाटा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले नाही; म्हणून ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेतून आमदार झाले, असे दळवी यांना सांगायचे आहे, अशी पडद्यामागची गोष्ट खासदार सुनील तटकरे यांनी या वेळी सांगितली.

Sunil Tatkare-Mahendra Dalvi
कोकणात शिवसेनेला धक्का : माजी उपनगराध्यक्षांनी काही महिन्यांतच सोडला पक्ष

पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नागोठणे पत्रकार संघातर्फे आयोजन करण्यात आले हेाते. त्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यातील जुगलबंदी नागोठणेकरांना अनुभवला मिळाली. खासदार तटकरे, आमदार दळवी, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Sunil Tatkare-Mahendra Dalvi
गिरीश महाजनांच्या विरोधात फास आवळला : टेंपोभर कागदपत्रे ताब्यात!

रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी खासदार सुनील तटकरे यांच्या भोवती फिरत असते. त्यामुळे प्रत्येक राजकीय केंद्रबिंदू हा तटकरे यांच्या भोवती फिरत असतो. अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी याच कार्यक्रमातील आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांच्यामुळे मी आमदार झालो, असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Sunil Tatkare-Mahendra Dalvi
मी शिवसेना सोडणार नाही

आमदार दळवी यांच्या या वक्तव्याला सुनील तटकरे यांनी ‘दळवी यांना आमदार करण्यात माझा कोणताही हात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले नाही, त्यानंतर दळवी हे शिवसेनेत गेले आणि विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत आमदार झाले. मात्र त्यांना हे माझ्या तोंडातून वदवून घ्यायचे असल्याने त्यांनी याबाबतचे भाष्य केले असावे, असे तटकरे यांनी सांगितले. आमदार दळवी यांना बत्ती कशी लावायची आणि विझवायची, हे बरोबर माहीत आहे. अशी मिश्किल जुगलबंदी कार्यक्रमात उपस्थितांना पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com