UPSC Final Result : तिसऱ्या प्रयत्नात तुषारने मिळविले डोळे दिपविणारे यश!

UPSC Civil Services Exam Result 2022 : कोकणातील सिंधुदुर्गच्या तुषार पवार या विद्यार्थ्यांने 861 व्या रँकने 'यूपीएससी' परीक्षा पास केली
UPSC Final Result, Tushar Pawar
UPSC Final Result, Tushar PawarSarkarnama

Sindhudurg : केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल मंगळवारी (ता.23) जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.'यूपीएससी'मध्ये ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली तर देशात 25 वी आली आहे. तर रिचा कुलकर्णी हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला.

याच परीक्षेत कोकणातील सिंधुदुर्गच्या तुषार पवार या विद्यार्थ्यांनेही 861 व्या रँकने 'यूपीएससी'ची परीक्षा पास केली आहे. तुषार पवार या विद्यार्थ्यांने एका वृत्तवाहीनीशी बोलताना आपण मिळवलेल्या यशाबद्दल सांगितलं की, "ही परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला. या परीक्षेत मी पास झालो हे माझ्या आई-वडिलांना सांगितलं त्यावेळी एक वेगळा आंनद झाला ".

UPSC Final Result, Tushar Pawar
UPSC Civil Services Exam Result 2022 : आर्थिक अडचणीवर मात करत नगरचा मंगेश बनला 'आयपीएस'

"'यूपीएससी'ची परीक्षा देण्याचा विचार मी 12 वीनंतर केला. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यात आलो. पुण्यात एका कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. याच दरम्यान मी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी केली. यामध्ये दोन अॅटेम्ट दिल्या. मात्र, यश आलं नाही. त्यानंतरही जिद्द सोडली नाही. पण यावेळी यश आलं", असं तुषार पवारने यावेळी सांगितलं.

"मला 'यूपीएससी'ची परीक्षा देण्यासाठीची प्रेरणा मामांकडून मिळाली. नागरी सेवा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर सातत्य खूप महत्वाचं आहे. माझे वडील खरेदी-विक्री संघात सेल्समन आहेत, तर आई गृहिणी आहे. 12 वीला असताना मला शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीमधून मिळालेल्या पैशावर मी क्लास लावले. सरकारचं वसतीगृह मिळालं होतं. त्यामध्ये तीन वर्ष राहिलो. कोरोनाच्या काळात मी घरी गेलो. त्यावेळी मी अभ्यासाकडे लक्ष दिलं, त्याचाही खूप फायदा झाला", असंही तुषारने सांगितलं.

UPSC Final Result, Tushar Pawar
UPSC Final Result : दोन प्रयत्नात अपयश, तिसऱ्यावेळी राज्यात पहिली; कश्मिराने सांगितलं 'यूपीएससी'तील यशाचं गमक

"'यूपीएससी'त दोनदा यश आलं नाही. मात्र, खचून न जाता पुन्हा प्रयत्न केले.'यूपीएससी' देताना यश मिळालं नाही तर आपलं नेमकी काय चुकतंय? या गोष्टी अनॅलिसीस केल्या. ज्यावेळी परीक्षा जवळ यायची त्यावेळी 12-12 तास अभ्यास व्हायचा. अभ्यासात कधीही मोठा खंड पडू दिला नाही. मी माझ्या स्वत:च्या नोट्स काढल्या. त्याचा मोठा फायदा झाला", असं तुषार पवारने 'यूपीएससी' परीक्षेच्या यशामागचं गमक सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com