
Shivsena News : संजय राऊत यांनी त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग आहे. त्यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकून यांना सुपारी दिल्याचा आरोप केला होता.
त्याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात आला. त्यात त्यांनी ही सर्व माहिती सामनाचे सहसंपादक चिंदरकर यांनी माहिती दिल्याचे सांगितले. चिंदकर यांनी मात्र त्यास नकार दिला आहे. यावरून शिवसेनेचे रामदास कदम यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, "राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना बदनाम करण्यासाठी आणि स्वतःची सुरक्षा वाढवून घेण्यासाठी आरोप केले. त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. त्यासाठी राजा ठाकूरला सुपारी दिली. त्याबाबत सामनाचे सहसंपादकांनी माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. सहसंपादकांनी मात्र, तुम्ही सावध रहा, तुमच्यावर कधीही शाईफेक होऊ शकते, असा जबाब ठाणे पोलिसांना दिला आहे. यावरून संजय राऊत खोटे बोलतात, हे स्पष्ट होते."
यानंतर कदमांनी राऊतांना इशाराच दिला आहे. ते म्हणाले, "मी कधीही संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली नाही. आजपर्यंत शांत होतो, आता मात्र आता डोक्यावरून पाणी गेले. आपण मुळात शिवसैनिक नाहीत. पण उसनं आवसान आणून शिवसेना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आव आणत आहात. ते आधी थांबवा. यापुढे एकही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही."
यानंतर रामदास कदम यांनी बाळासांहेबांची (Balasaheb Thackeray) आठवण काढून राऊतांचा शेलक्या शब्दात समचार घेतला. यावेळी त्यांनी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, असे आव्हानही केले.
कदम म्हणाले, "बाळासाहेब म्हणायचे की भाडगं अधिक कडवं असतं. तुम्ही अधिक कडवेपणा दाखवताय. खासदारांचे भाव तुम्हीच ठरवता, आमदारांचे, नगरसेवकांचेही भाव ठरवता, निवडणूक आयोगावर भ्रष्टाचाराचा आरोप करता. राऊतजी आता अति झालं. अति झाल्यावर माती होते. अजूनही तुम्ही थांबा; अन्यथा बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.