आमदार वैभव नाईकांनाही ५० कोटींची ऑफर

Vaibhav Naik|Vinayak Raut|Shivsena : भाजपने शिवसेना आमदारांच्या आणि त्‍यांच्या कुटुंबीयांच्या मागे ‘ईडी’ची कारवाई लावली.
Vaibhav Naik  Latest News
Vaibhav Naik Latest NewsSarkarnama

कणकवली : "कोणी कुठल्‍या पक्षात गेले तरी शिवसेना (Shivsena) संपणार नाही. सावंतवाडी आम्‍ही जिंकणारच पण त्‍याचबरोबर कणकवलीही जिंकायची आहे, त्यासाठी कामाला लागा", असे आवाहन खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गुरुवारी (ता.7 जुलै) केले.

भाजपने (BJP) 50 ते 70 कोटी रुपये देऊन शिवसेनेसह अपक्ष आमदार विकत घेतले आहेत. आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनाही पन्नास कोटींची ऑफर होती, असाही गौप्‍यस्फोट त्‍यांनी केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राऊत बोलत होते. माजी महापौर दत्ता दळवी, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत आदी उपस्थित होते. (Vaibhav Naik Latest Marathi News)

Vaibhav Naik  Latest News
भाजप-शिंदे गटामध्ये वादाची पहिली ठिणगी; केसरकर फडणवीसांकडे करणार तक्रार

राऊत म्‍हणाले, भाजपने शिवसेना आमदारांच्या आणि त्‍यांच्या कुटुंबीयांच्या मागे ‘ईडी’ची कारवाई लावली. त्‍यानंतर 50 ते 70 कोटींची ऑफर देऊन आमदारांना विकत घेतले. ‘मातोश्री’वर कालपर्यंत अन्न हातात घेऊन शिवसेनेशी एकनिष्‍ठ राहण्याची शपथ घेणारे आमदारही भाजपच्या कळपात गेले. जे गेले, त्‍यांच्याबाबत अजिबात दु:ख बाळगू नये तर नव्या जोमाने शिवसेनेची उभारणी करावी, असे राऊत म्हणाले.

Vaibhav Naik  Latest News
ठाकरेंसोबत फोटो काढायलाही आम्हाला बोलवत नव्हते...

राणेंच्या मंत्रिपदाचे विसर्जन झाले...

शिवसेनेवर सातत्‍याने टीका करणाऱ्या आमदार नीतेश राणे यांची अवस्था आता बघण्यासारखी झाली आहे. मंत्रिपद मिळेल म्‍हणून ते आशेवर होते. मात्र, भाजपने बंडखोरांना जवळ करून राणेंच्या संभाव्य मंत्रिपदाचे गडनदीत विसर्जन केले आहे. सर्व पक्ष फिरून गेलेल्‍या राणे कुटुंबीयांतील कुणाच्याही वक्तव्याला शिवसेना महत्त्व देत नाही, असेही राऊतांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com