तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे : सेना आमदारालाच धमकी

नाणार रिफायनीला (Nanar Refinery) विरोध न करण्यासाठी हा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे.
तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे : सेना आमदारालाच धमकी
MLA Rajan Salvi Sarkarnama

रत्नागिरी : ''रिफायनरीमे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज (विरोध) मत करना। नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक देंगे।,' अशी धमकी राजापूर विधासनभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना फोनवरून देण्यात आली. यामुळे त्यांना व कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. साळवी यानी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

MLA Rajan Salvi
बार्शीच्या `हर्षद मेहता` च्या करामती : `दहा लाख गुंतवा; वर्षात सहा कोटी हसत न्या!`

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, आमदार राजन साळवी सेनेचे आमदार म्हणून २००९ पासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला त्यानी स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला. आता पुन्हा समर्थकांनी प्रकल्प होण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. १० जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता ही धमकी देण्यात आली. त्याच दिवशी रात्री ११ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास परत फोन करून ‘रिफायनरीमे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना, नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक कर देंगे।’ अशी धमकी दिली. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी १२ जानेवारीला शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

‘धमकीच्या चौकशीची मागणी’
आमदार राजन साळवींना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत, अशा धमक्यांना ते घाबरत नाहीत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मी करणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.