नितेश राणेंच्या मंत्रिपदाची चर्चा आणि इकडे केसरकरांनी लावला बॉम्ब....

Nitesh Rane | Dipak Kesarkar | Shivsena : नितेश राणे मंत्री झाल्यास केसरकर यांच्या कोकणातील स्थानिक राजकारणाला फटका बसू शकतो
Nitesh Rane | Dipak Kesarkar
Nitesh Rane | Dipak KesarkarSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देवून पुन्हा भाजपशी युतीची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रात मंत्री केल्याने ही चर्चा फिसकटली, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय केसरकर यांनी मागील अडीच वर्षांतील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

केसरकर म्हणाले, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे काम राणे पितापुत्रांनी केले. भाजपच्या कार्यालयात त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन ही चिखलफेक सुरूच ठेवली होती. या चिकलफेकीसाठी भाजपचे व्यासपीठ त्यांना वापरू देऊ नका, अशी विनंतीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यावेळी केली होती, असे सांगत गौप्यस्फोटांचा बॉम्बच केसरकर यांनी लावला.

संभाव्य मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेश यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर नितेश राणे मंत्री झाल्यास केसरकर यांच्या कोकणातील स्थानिक राजकारणाला फटका बसू शकतो अशा चर्चा आहेत. त्यामुळेच दीपक केसरकर अस्वस्थ झाले असल्याचे बोलले जात आहे.

राणेंमुळे संभाव्य युती फिस्कटली :

सुशांतसिंह राजपूत प्रकरण सुरु असताना नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरु होता. मात्र राणे पिता-पुत्रांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. याबाबत पंतप्रधानांना वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यावर बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबद्दलचे प्रेम आणि आदर यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद करण्यास सुरुवात होती, असेही केसरकर यांनी सांगितले.

तसेच नारायण राणे यांच्यामुळे युतीचा प्रयत्न पहिल्यांदा फिसकटल्याचा दावा केसरकर यांनी केला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, त्याचदरम्यान नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले आणि या दोघांचा संवाद थांबला, असा दावाही केसरकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in