शिवसेनेची धडाडती तोफ भास्करराव जाधव कुठे आहेत? पहा व्हिडीओ

Bhaskar Jadhav| एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री झालात तुमच्यावर खूप जबाबदारी आहे.
Bhaskar Jadhav| shivsena
Bhaskar Jadhav| shivsena

चिपळूण : विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं.

समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस चालताना त्रास होत होता. पण त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.

Bhaskar Jadhav| shivsena
वळसे पाटलांची पाचव्यांदा बाजी; बिनविरोधसाठी आढळरावांचेही सहकार्य

विधीमंडळात शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्ले

४ जुलै रोजी विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर विधिमंडळात बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आक्रमकपणे आपले मत मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाही भास्कर जाधवांनी केला.

भास्कर जाधव म्हणाले, "शिंदेच्या कोकणातील कामामुळे मी भारावून गेलो होतो. मी शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात दोन-तीन वेळा गेलो. त्यांची फक्त एकदाच भेट झाली. ते माझ्याशी एकदाही बोलले नाहीत," "एकनाथ शिंदे आजही सांगतात मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री झालात तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. तुम्ही माझ्याशी कधी बोलत नव्हता," असे जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com