भुजबळ-राणेंचे बंड स्वबळावर, शिंदेचे भाजप पुरस्कृत; शिवसेनेचा खोचक टोला

Anant Geete| Shivsena| एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
Anant Geete
Anant Geete

रत्नागिरी : 'नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी जे बंड केलं स्वबळावर केलं होतं. पण एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप (BJP) पुरस्कृत आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.पण आता शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवे सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर अनंत गीते यांनी भाष्य केलं आहे.

Anant Geete
शिवसेनेचा अखेर स्वबळाचा नारा; आदित्य ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर!

नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी स्वबळावर बंड केलं. पण काँग्रेसने नारायण राणेंच्या बंडाला सहकार जरुर केला, पण त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. पण एकना शिंदेंच हे बंड हे भाजप पुरस्कृत आणि भाजप रचित असल्याची टीका गीते यांनी केली आहे. बंडखोर आमदार राष्ट्रवादी-काँग्रेसवर अनेक आरोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप या आमदारांकडून केला जात आहे. त्यातच आता अनंत गीते यांनीही शिवसेनेला स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

''महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं, तशी विनंती मी स्वत: उद्धव ठाकरे यांना करणार आहे. उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही गीते यांनी व्यक्त केला आहे. तसेच, कोकणातील पाच आमदार शिंदे गटात सामील झाले. पण यातल्या एकही आमदार पुन्हा विजयी होणार नाही. हे सर्व आमदार हरणार, असही गीते यांनी म्हलं आहे. माजी मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. पण आता रत्नागिरीमध्ये नवीन आमदारांचा उदय होणार, असही अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in