पंचवीस वर्षांनंतर सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन दळवी बांधणार 'घड्याळ'

सूर्यकांत दळवी (suryakant dalvi) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
पंचवीस वर्षांनंतर सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन दळवी बांधणार 'घड्याळ'
suryakant dalvisarkarnama

दापोली : सलग पाच वेळा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक जिंकणारे सूर्यकांत दळवी (suryakant dalvi) यांनी शिवसेनेला (shiv sena) 'जय महाराष्ट्र' करीत अखेर हाती 'घड्याळ' बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी (ता.२) दळवी हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पक्षांतराचा हा कार्यक्रम होणार आहे. दळवी यांना काही दिवसांपासून शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. दळवी यांनी अनेकवेळा पक्षाबाबत नाराजी जाहीरपणे प्रकट केली आहे. दळवी यांच्या पक्षांतराने सुनील तटकरे यांची दापोलीतील ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

उद्या त्यांच्यासोबत दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, शांताराम पवार, नगराध्यक्ष परवीन शेख, प्रदेश युवा सेना पदाधिकारी ऋषिकेश गुजर आदींसह अनेक शिवसेना नेते उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

suryakant dalvi
मोदींनी नाकारल्यानंतर दहा मिनिटांतच कुंटे बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार !

''शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांच्या आदेशाप्रमाणे कोकणामध्ये शिवसेना वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे केले. पक्षानेही त्यावेळी विधानसभा निवडणुकीत संधी दिली व मी आमदार झालो. त्यानंतर सलग पाचवेळा आमदारकी भूषविण्याची संधी पक्षाने दिली. मात्र 2014 च्या निवडणुकीत स्वकीयांनी केलेल्या दगाबाजीमुळे माझा काही मतांनी पराभव झाला. पराभव कसा व कोणामुळे झाला हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर पक्षाकडून सातत्याने डावलले आहे. या कार्यपद्धतीवर नाराज असून माझी पक्षात घुसमट होत आहे,'' असे दळवी यांनी यापूर्वी माध्यमांना सांगितलं आहे.

दापोलीच्या राजकारणात सूर्यकांत दळवी आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पक्षांतर्गत एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. रामदास कदम यांनी विधानसभेसाठी आपले चिरंजीव योगेश कदम यांना उमेदवारी मिळवून दिली होती. ते दापोली मतदारसंघात २०१९ मध्ये निवडून आणले होते. या निवडणुकीपूर्वी नाराज सूर्यकांत दळवी भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत, या चर्चांना उधाण आले होत. दळवी कधी एकदा पक्ष सोडून जातील, याकडे शिवसेनेच्या काही नेते लक्ष ठेवून होते.

गेले अनेक दिवस माजी आमदार सूर्यकांत दळवी हे शिवसेनेत तसेच राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील संभाषणाची कथित क्लिप बाहेर आल्यावर राजकारण चांगलेच तापले होते. त्यावर भाष्य करून सूर्यकांत दळवी यांनीही त्यात उडी घेऊन माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर तोंडसुख घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.