Konkan News : कोकणात ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का : तब्बल २७ वर्षे मोठ्या पदावर असणारा नेता शिंदे गटात सामील

प्रमोद पवार व काही सहकारी हे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.
Pramod Pawar joins Shinde group
Pramod Pawar joins Shinde groupSarkarnama

देवरूख (जि. रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेचा (Shivsena) दबदबा कायम टिकवून ठेवणारे २७ वर्षे तालुकाप्रमुख म्हणून राहिलेले प्रमोद पवार सहकाऱ्यासह एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सामील झाले आहेत. आत्ता निवडणुकांच्या काळात जे ठाकरे सेनेचे निष्ठावंत असल्याचे भासवत आहेत, त्यांनी राष्ट्रवादीला (NCP) मदत केल्याचा गौप्यस्फोट करून अनेकजण आजही राष्ट्रवादीशी सलगी करून असल्याचा दावा प्रमोद पवार यांनी केला आहे. (Shiv Sena's Sangameshwar taluk chief Pramod Pawar joins Shinde group)

पवार यांच्यासह कासार कोळवणचे माजी सरपंच व रोहन बने यांचे निकटवर्तीय असलेले सचिन मांगले, आंबव कोंडकदम रावचे माजी सरपंच व माजी मंत्री रवींद्र माने यांचे बंधू रूपेश (बाळा) माने, मारळ-मार्लेश्वर विभागातील खंदे कार्यकर्ते व जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक यांचे विश्वासू सहकारी प्रसाद सावंत, खाडीपट्टातील महेश देसाई यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत शिंदे गटात दाखल झाले आहेत.

Pramod Pawar joins Shinde group
मोठी बातमी : २४ तासांत खुलासा करा; अन्यथा कारवाई करू : कर्नाटकात जाण्याचा ठराव केलेल्या ११ गावांना बीडीओंची नोटीस

पवार म्हणाले, या साऱ्याच गोष्टी वेळोवेळी वरिष्ठांच्या कानावर घालूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासोबतच यापुढे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pramod Pawar joins Shinde group
Solapur News : मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाचा विजयदादांच्या उपस्थितीतच भाजपत प्रवेश

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत हा प्रवेश झाल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.तालुक्यात शिवसेनेचा दबदबा टिकवणारे, देवरूख पंचायत समितींवर सेनेची एकहाती सत्ता टिकवणारे, तालुकाप्रमुख शिंदे गटात गेल्याने तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पवार यांच्या पाठीशी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते असून एक मोठा गट शिंदे गटात सामील झाला आहे. प्रमोद पवार व काही सहकारी हे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वीच माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात सामील झाले होते. तेव्हापासूनच सेनेतील अनेकजण तळ्यातमळ्यात होते. त्यामुळे काहीजण शिंदे गटात जाणार हे निश्चितच होते.

Pramod Pawar joins Shinde group
Mohite Patil : विजयदादा भाजपत असेपर्यंत त्यांचा लक्ष्मण म्हणून काम करेन : सुभाष पाटलांनी गायले मोहिते पाटलांचे गोडवे

खासदार विनायक राऊतांचे दुर्लक्ष

अनेक काळ पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीला अनेक पदाधिकारी कंटाळले असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते व विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतरही संगमेश्वर तालुक्यातील संघटनेकडे व विकासकांमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मंत्री उदय सामंत यांनी आमच्या कामांना प्राधान्याने अग्रकम देऊ, हा विश्वास दिल्याने नाईलाजाने पद त्याग करत शिंदे गटात जात असल्याचे त्या सर्वांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in