राजु पाटलांमुळेच मनसेला गळती! श्रीकांत शिंदेंनी बाण सोडत केलं घायाळ

दोन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांना फोडत शिवसेनेने मनसेला धक्का दिला आहे.
राजु पाटलांमुळेच मनसेला गळती! श्रीकांत शिंदेंनी बाण सोडत केलं घायाळ
MP Shrikant Shinde, MLA Raju PatilSarkarnama

कल्याण : मनसेच्या (MNS) दोन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांना फोडत शिवसेनेचे नेते व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजु पाटील यांना धक्का दिला आहे. तसेच राजु पाटील हे प्रत्येक विकासकामाला लक्ष करत असल्याने या परिस्थितीला कंटाळून मनसेला गळती लागल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. (Shiv Sena MP Shrikant Shinde News)

राजु पाटील यांच्या मतदारसंघातीलच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत म्हटले की, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे नकारात्मक राजकारणावर भर देत आहेत. केवळ प्रतिक्रियावादी बनत प्रत्येक विकासकामाला लक्ष्य करत असल्याचे चित्र दिसते आहे. याच परिस्थितीला कंटाळून गेल्या काही दिवसात मनसेला गळती लागत असल्याचे चित्र आहे. (Shivsena-MNS latest news update)

MP Shrikant Shinde, MLA Raju Patil
शिवसेनेच्या दणक्यानंतर मनसे आमदार राजू पाटील संतापले अन् दिला इशारा

दरम्यान, कल्याण -डोंबिवलीतील घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेचे माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने आणि मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील यांच्यासोबत सुभाष तुकाराम पाटील, पांडे अण्णा, निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे, विठ्ठल शिंदे आदींनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष संदीप मोरे यांनीही मनसेला रामराम ठोकला आहे. (MNS Raju Patil Latest Marathi News)

राजु पाटील यांची शिवसेनेवर टीका

यावर बोलताना पाटील म्हणाले, कालच ते पदाधिकरी मला भेटले होते. खोट्या केसेच्या धमक्या देत आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितलं. लुटमारी करण्याची त्यांची जुनी सवय आहे. पक्षप्रमुखच कोत्या मनाचे आहेत, मग त्यांच्या पिल्लाकडून काय अपेक्षा करणार, असा संतापजनक सवाल पाटील यांनी केला. हे अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असं पाटील म्हणाले.

MP Shrikant Shinde, MLA Raju Patil
भाजपच्या एका नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलीस आमनेसामने; तब्बल सात तास 'भागमभाग'

प्रत्येक मनसैनिक हा इथला नगरसेवक, आमदार असल्यामुळे कोण पक्षातून गेल्याने आम्हाला फरक पडणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. घाणेरडे राजकारण करून आपला पक्ष वाढविण्याची वेळ त्यांच्यावर यावी सारखी दुर्दैवी बाब नाही. विचाराची लढाई विचारांनी लढवली जावी, मात्र दुर्दैवाने त्यांना हे सध्या समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी नाही. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते नगरसेवक पळविण्याचे आम्हाला राज ठाकरे यानी शिकविलेले नाही. मला कोणी ठरवून त्रास देऊ शकत नाही. कोणी मला वैयक्तीक घेऊ नये, असा इशारा पाटील दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.