हे नुसतं म्हणायलाच ठाकरे सरकार...हे तर पवार सरकार : गजानान किर्तीकरांची खदखद

निधीवाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) खदखद
Gajanan Kirtikar, Yogesh Kadam
Gajanan Kirtikar, Yogesh Kadamsarkarnama

दाभोळ : केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार (Thackeray government) मात्र, प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार, असे म्हणत शिवसेनेचे (Shivsena) मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी किर्तीकर बोलत होते.

यावेळी किर्तीकर म्हणाले, एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून, आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

Gajanan Kirtikar, Yogesh Kadam
शिवसेनेचे पाच आमदार पाडणाऱ्या काँग्रेसला जागा सोडावी लागल्याचे दुःख मोठे

दरम्यान, शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर किर्तीकर यांनीही आता महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केल्याने या आघाडीत सर्वच आलबेल नाही असे दिसून येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांच्या खात्यांना त्यानंतर काँग्रेसच्या (congress) मंत्रांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ १६ टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना मिळाला आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

खासदार किर्तीकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांचा सत्कारहि करण्यात आला, ते म्हणाले कि अंतर्गत भेदीही खूप आहेत त्यांचाही त्रास होतो. हा त्रास मुंबई शहरात एवढा होत नाही. मात्र, इकडे जास्त आहे, असे म्हणत त्यांनी तुला ते भोगायला लागते आहे असे त्यांनी योगेश कदम यांना सांगितले. आपण तुझ्या पाठीशी आहोत असा धीरही त्यांनी योगेश कदम यांना दिला. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील मोबाइलवरील कथित संभाषण उघड झाल्यावर शिवसेनेतून रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश यांना साईटलाईन करण्यात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

Gajanan Kirtikar, Yogesh Kadam
मला मंत्री केले असते तर शिवसेनेचे आठ आमदार करून दाखवले असते : क्षीरसागरांची खंत

दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडीचे अधिकार योगेश कदम यांना न देता ते माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना देण्यात आले होते. तसेच योगेश यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे दळवी यांच्या गटाच्या पदाधिकार्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यामुळे योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com