सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू : वैभव नाईकांचा राणेंना इशारा

नितेश राणेंच्या Nitesh Rane आरोपाला शिवसेनेचे Shivsena आमदार MLA Vaibhav Naik वैभव नाईक यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर Answer in language दिले.
Nitesh Rane, Vaibhav Naik
Nitesh Rane, Vaibhav NaikSarkarnama

सिंधुदुर्ग : शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आपणही चर्चेत यावं म्हणून नितेश राणे आरोप करीत आहेत. सुपारीबाज कोण आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू, असा इशाराच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिला आहे.

नितेश राणेंच्या आरोपाला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. तसेच त्यांनी नितेश राणेंसह नारायण राणेंवर ही निशाणा साधला. वैभव नाईक म्हणाले, सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या हे संपूर्ण राज्याला माहित आहे. त्या मागचा इतिहासही माहिती आहे.

Nitesh Rane, Vaibhav Naik
केसरकर आता 'विश्वप्रवक्ता' असल्यासारखेच वागताहेत....निलेश राणे

उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंचे शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आहे. त्याची सुपारी कोणी घेतली हे न्यायालयाने त्यांचा जामीन नाकरल्यावर उघड झाले. शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत.

Nitesh Rane, Vaibhav Naik
एकनाथ शिंदे नारायण राणे होतील : शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

सुपारीबाज कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू, असा इशाराच त्यांनी नितेश राणेंना दिला आहे. आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंनाही लक्ष्य केले. राणे हे खुनाच्या घटनांबद्दल अनेक दाखले देत आहेत. त्यांना खुनांच्या घटनांबद्दल अधिक माहिती आहे. माझी सरकारला विनंती आहे की, अनेक खुनांची प्रकरणे उघड करता येतील. अंकुश राणे, मंचेकर, रमेश गोवेकर ही सर्व प्रकरणे सरकारने उघडली पाहिजेत. त्यांच्या मागे कोण आहे याचा तपास केला पाहिजे, अशी माझी सरकारकडे मागणी आहे, असेही नाईक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in