निलेश राणेंच्या टीकेनंतर शिवसैनिक गप्प राहिल्याने केसरकर संतापले!

उद्धव ठाकरेंचा पुळका असेल तर मातोश्रीवरून जाऊन भांडी घासा, अशी टीका राणेंनी केली होती.
Nilesh Rane Latest Marathi News, Deepak Kesarkar Latest News
Nilesh Rane Latest Marathi News, Deepak Kesarkar Latest Newssarkarnama

मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी अपशब्द काढू नयेत, असं आवाहन केलं होतं. त्यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केसरकरांवर जोरदार टीका केली होती. ठाकरेंचा एवढाच पुळका असेल तर मातोश्रीवर जाऊन भांडी घसा, असं ट्विट राणे यांनी केलं होतं. त्यावरून केसरकर शिवसैनिकांवरच संतापले आहेत. (Deepak Keasrkar News)

केसरकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत राणेंना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, भाजपच्या कुणीही लोकांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलू नये, हे मी सभेत बोललो होतो. फडणवीसांनी ते कबूल केले होते. आता सोमय्याही बोलत नाहीत. असं असतानाही नारायण राणेंच्या मुलाने जे ट्विट केलं होतं की, उद्धव ठाकरेंविषयी एवढं प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासायला जा.

Nilesh Rane Latest Marathi News, Deepak Kesarkar Latest News
'मविआ'ला आणखी धक्के बसणार; मुर्मू यांना 200 आमदारांची मतं देण्याचं शिंदेंनी केलं जाहीर

माझ्या मनात ठाकरेंबद्दल असलेल्या प्रेमाचा हा अपमान होता. पण सिंधुदुर्गातील एकाही शिवसैनिकाला असं वाटलं नाही की, याचा आपण निषेध करावा. आम्ही संघटनेमध्ये काम करताना नेत्यावर निष्ठा ठेवून काम करतो. जर ही शिवसैनिकांची भूमिका असेल तर ती माझी एकट्याची जबाबदारी नाही. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंबद्दल बोलावे, असं जर शिवसैनिकांना वाटत असेल तर मी त्यावर पुन्हा बोलणार नाही, असं केसरकर यांनी संतापाच्या सूरात सांगितलं.

मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे. मी उद्धव ठाकरे किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता नाही. राणेंच्या मुलांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी काम करताना मी स्वत: राणेंशी बोलेन. त्यांच्या मुलांशी कशाला बोलेन. तेवढा मी ज्येष्ठ आहे, असं केसरकर म्हणाले.

मी अनेकदा जाहीर सांगितले आहे की, राणेंशी माझा वैयक्तिक वाद नाही. त्यांचे कार्यकर्ते ज्यापध्दतीने वागतात, त्यांच्या कार्यशैलीवर माझा आक्षेप आहे. हे बदललं तर माझा काहीच वाद राहणार नाही. पण माझ्या एक लक्षात आले आहे की, राणेंच्या व्यतिरिक्त इतर कुणाशी बोलावं, असं वाटत नाही. आमचं यापुढचं बोलणं महाराष्ट्राच्या हिताचं असेल, असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com