श्रीधर नाईक खून खटला राणेंच्या जुन्या सहकाऱ्यानेच उकरून काढला!

कणकवलीत राणे विरूध्द पारकर संघर्ष...
Narayan Rane News in Marathi, BJP News
Narayan Rane News in Marathi, BJP NewsSarkarnama

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्या खटल्यात आरोपी होते तो श्रीधर नाईक खून खटला शिवसेनेनं पुन्हा उकरून काढला आहे. त्यासाठी निमित्त ठरलं आहे, कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यानाचे उद्‌घाटन. शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर यांनी राणेंच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरूध्द शिवसेना वाद पेटला आहे. (Narayan Rane Latest Marathi News)

नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आम्‍हीही काँग्रेसमध्ये गेलो. ही मोठी घोडचूक होती. राणेंसोबत गेल्‍याचा मोठा राजकीय फटका बसला. चूक लक्षात आल्‍यानंतर त्यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पण ज्यादिवशी ते भाजपमध्ये आले त्‍याच दिवशी आम्‍ही भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केल्‍याचे पारकर यांनी सांगितले. (Shiv Sena Leader Kanhaiya Parkar criticizes Narayan Rane)

Narayan Rane News in Marathi, BJP News
सदाभाऊ खोत यांची माघार; भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात

नाईक खून खटल्याचा उल्लेख करत पारकर यांनी थेट राणेंवर निशाणा साधला आहे. उद्यानाचे उद्गाटन नारायण राणे यांच्या हस्ते कोणत्‍याही परिस्थितीत होऊ नये. राणे हे श्रीधर नाईक यांच्या खून खटल्‍यातील आरोपी होते. खटल्‍यातून ते निर्दोष सुटले असले तरी त्‍यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले तर ते राजकीय दहशतवादाला खतपाणी घातल्‍यासारखे होईल, असं शरसंधान पारकर यांनी साधलं आहे.

कणकवलीतील नाईक खुनाच्या जखमा अजूनही ताज्‍या आहेत. या खटल्‍यात शिक्षा झालेले नंतर मुक्‍त झाले. आता ते राणेंकडे कामाला आहेत. त्‍यामुळे उद्यानाचे उदघाटन राणे यांच्या हस्ते करणे ही बाब योग्‍य नाही. एक वेळ राणे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिले तरी चालतील; पण त्‍यांच्या हस्ते उद्‌घाटन होऊ नये, असं पारकर म्हणाले आहेत.

Narayan Rane News in Marathi, BJP News
हंडोरेंकडे जमिनीचा तुकडाही नाही; सदाभाऊंकडे 57 लाखांच्या दोन गाड्या अन् चौदा गुन्हे

श्रीधर नाईक यांचा खून झालेल्या दिवशीच उद्यानाचे उद्‌घाटन होत असून हा चांगला योग आहे. या दिवशी उद्यानाचे उद्‌घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर श्रीधर नाईक यांच्या पत्‍नी क्षमा नाईक यांच्या हस्ते व्हायला हवे. खरं तर २२ जून हा दहशतवादी दिवस जाहीर व्हायला हवा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनीही केली होती. त्‍यामुळे यादिवशी राणेंच्या हस्ते उद्यानाचे उद्‌घाटन ही बाब मान्य नाही, असं पारकर यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com