आमदार कदम गट बंडाच्या तयारीत : परब म्हणतील ती शिवसेना आम्ही मानत नसल्याचा इशारा

दापोली, केळशीतील शिवसैनिकांच्या बैठकीत आमदार योगेश कदम यांचे जाहीर समर्थन
Shiv Sainiks

Shiv Sainiks

sarkarnama

दाभोळ (जि. रत्नागिरी) ः दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (anil parab) यांनी येथील शिवसैनिकांवर दाखवलेल्या अविश्‍वासाने दापोली शहरातील शिवसैनिक पेटून उठले आहेत. पालकमंत्री अनिल परब म्हणतील आणि ठरवतील, ती शिवसेना आम्ही मानत नाही. पालकमंत्र्यांच्या येण्याआधीपासूनच आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका येतच राहतील, पदे येतील, जातील. आम्ही आजन्म शिवसैनिकच राहणार, असे प्रतिपादन करत आमदार योगेश कदम (yogesh kadam) यांचेच नेतृत्व आम्ही मानणार, असा नारा शहरातील शिवसैनिकांनी दिला.(Shiv Sainiks support MLA Yogesh Kadam in Dapoli meeting)

दापोली शहरातील कोकंबाआळी येथील शिवसेना तालुका संपर्क कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष आणि शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र पेठकर यांच्या उपस्थितीत शहरातील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या जय जयकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडत आमदार योगेश कदम यांना पाठिंबा दर्शविला.

Shiv Sainiks

प्रकाश आवाडे, आबिटकर निवडणूक लढवलेल्या पतसंस्था गटात धक्कादायक निकालाची शक्यता

शहर उपप्रमुख मंदार केळकर, रोहन तलाठी, दीपक सूर्यवंशी शिवसेना शाखाप्रमुख बाबू शिर्के, अशोक माने, सुयोग घाग, जावेद सारंग, राजू पाटील, रसिक म्हामुणकर, पिंकू शिंदे, प्रवीण शेठ, महिला आघाडी शहर संघटिका रसिका पेटकर, युवती शहर संघटक किर्ती परांजपे, युवा शहर अधिकारी स्वप्निल पारकर, प्रकाश साळवी आदींसह दापोली छोटा व्यावसायिक खोकेधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे यानी योगेश कदम याना उघड पाठिंबा दिला.

Shiv Sainiks

अमित शहांनी निकाल घेतला : साखर उद्योगाचे 37 वर्षांचे दुखणे क्षणात दूर!

शिवसेनेचे संघटन मजबूत

योगेश कदमांच्या कार्यकाळात शिवसेनेचे संघटन हे मजबूत स्थितीत निर्माण झाले आहे. आमदार योगेश कदम यांनी दापोली शहराच्या वैभवात भर टाकणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारून दापोलीकरांचे स्वप्न पूर्ण केले, असा दावा आमदार कदम समर्थक यानी केला.

Shiv Sainiks

राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत कसल्या बैठका घेता? : नाना पटोलेंनी काँग्रेस नेत्यांना झाप झापले

केळशी गट योगेश कदमांच्या पाठीशी

कुणबी भवन आडे फाटा येथे शिवसेना केळशी विभागाची सभा झाली. सभेत दापोलीतील सध्याच्या राजकारणाबाबत तीव्र प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. पक्षातील नेत्यांकडून शिवसैनिक आणि आमदारांवरच अन्याय केला जात असल्याबद्दल शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.

सभेत दापोलीतील सद्यस्थितील राजकारणाबाबत चर्चा झाली. आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आणि पालकमंत्र्यांकडून आपल्याच आमदारांवर आणि सामान्य शिवसैनिकांकर अन्याय केला जात आहे. शिवसेनेची स्थिती दापोलीत मजबूत असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायचा प्रयत्न स्वकीयांकडून होत असल्याचे सभेत सांगण्यात आले. याबाबत शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. प्रामाणिकपणे काम करणाऱ्‍या आमदार योगेश कदम यांना जाणूनबुजून डावलण्याचे काम सुरू आहे. मात्र, संपूर्ण केळशी गट आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

सभेला शिवसेना तालुका संघटक उन्मेष राजे, महिला उपजिल्हा संघटक रोहिणी दळवी, उपतालुकाप्रमुख गुणाजी गाकणूक, माजी पंचायत समिती उपसभापती रवींद्र सातनाक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी, जिल्हा परिषदेच्या सभापती रेश्मा झगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com