आता काय करायचे..? शिवसेना-राष्ट्रवादीपुढे पेच!

दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युती करण्याचा वरिष्ठांचा निर्णय
Shivsena-NCP
Shivsena-NCPSarkarnama

दाभोळ : दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरुद्ध शिवसेना (shivsena) असा सामना रंगणार होता. दोन्ही पक्षातील नेत्यांनी यासाठी तयारीही केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर ही निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र लढविण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा दापोली शहरात सुरु असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. दोन्हीकडच्या शिलेदारांना आपापल्या तलवारी म्यान कराव्या लागणार आहेत. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व १७ जागा लढविण्याच्या तयारीत होती. मात्र, आघाडी झाल्यास थांबवायचे तरी कोणाला असा प्रश्न दोघांसमोर निर्माण होणार आहे. दोन्ही पक्षातील नाराज, अपक्ष निवडणूक लढवतील वा काहीजण भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात. (Seniors decide to NCP-Shiv Sena alliance in Dapoli Nagar Panchayat elections)

दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना व काँग्रेस एकत्र येऊन दापोली नगरपंचायतीची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. दापोली नगरपंचायतीवर मागील ५ वर्षे शिवसेना व काँग्रेस अशी आमची सत्ता होती. आमचा संसार सुखाचा झाला होता. पुढील संसारही चांगला होईल, असे सांगितले होते. मात्र त्यांनी शिवसेना किती जागा लढविणार व काँग्रेसला किती जागा देणार, यासंदर्भात नंतर माहिती दिली जाईल, असे सांगितले होते. गुरुवारी (ता. २) मुंबई येथे शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार आहे. काँग्रेसला बाजूला ठेऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्याची चर्चा दापोलीत सुरू आहे.

Shivsena-NCP
बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार

काँग्रेसला स्वबळावर लढावे लागणार

दापोली नगरपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी झाली. राष्ट्रवादीचे ४ व काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले होते. मात्र काँग्रेसने शिवसेनेशी प्रासंगिक करार करून दापोली नगरपंचायतीत सत्ता मिळविली. त्यामुळे २०२१ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही. शिवसेनेने प्रासंगिक करार कायम ठेवत काँग्रेसला १७ पैकी ६ जागा देण्याचे मान्य केले होते. कोठेतरी माशी शिंकली व शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले. काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढावी लागेल व काँग्रेसची दापोली शहरात किती ताकद आहे, हेही कळणार आहे.

Shivsena-NCP
अध्यक्षपदासाठी रोहिणी खडसेंचे नाव पुढे आले; पण...

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे दापोली नगरपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय वरिष्ठ घेतल्यास त्यांचे स्थानिक समितीकडून पालन केले जाईल, असे राष्ट्रवादीचे दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी सांगितले.

* नगरपंचायतीत येणार रंगत

* राष्ट्रवादी- सेना सामना रंगणार होता

* दोन्हीकडील शिलेदाराच्या तलवारी म्यान

* कॉंग्रेसची दापोलीतील ताकद कळेल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com