'झेडपी' अध्यक्षांच्या मतदारसंघात सेनेला अपयश; नेत्यांची होणार झाडाझडती

नेत्यांच्या मुजोर वागणुकीला मतदारांनी नाकारले असून बालेकिल्ला असलेला गड ढासळला असून कधी न दिसणारे राष्ट्रवादीचे घड्याळ वाजू लागले.
'झेडपी' अध्यक्षांच्या मतदारसंघात सेनेला अपयश; नेत्यांची होणार झाडाझडती
Palghar ZPsarkarnama

पालघर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत गटातटाच्या राजकारणामुळे शिवसेनेच्या चुकीच्या धोरणामुळे काही ठिकाणी पराभव पत्कारावा लागला. यातच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मतदारसंघात व राहत असलेल्या गावात दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे गड ढासळले आहेत. नवापूर व सालवड दोन्ही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा व दारचा उमेदवाराचा पराभव झाला आहे. यामुळे स्थानिक नेत्यांची झाडाझडती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पालघर जिल्हा परिषद व त्यामधील पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. काही ठिकाणी आपल्या जागा राखण्यात यश मिळवले असले तरी पारंपरिक निवडून येणाऱ्या जागेवर शिवसेनेचा मोठा पराभव झाला. यातच नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण यांचा मतदारसंघ असलेल्या नवापूर गण व राहत असलेल्या सालवड गणात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही गावे शिवसेनेचे बालेकिल्ले असतानाही याठिकाणी झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.

Palghar ZP
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेला फायदा, राष्ट्रवादीची आकडेमोड...

त्यामुळे येथील नेत्यांची शाळा वरिष्ठ लवकरच घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पालघर पंचायत समितीचे माजी सभापती असलेल्या मनिषा पिंपळे यांचे पती भरत पिंपळे यांना शिवसेनेकडून नवापूर पंचायत समिती गणात उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वडे 1561 मते मिळाली असून त्यांनी शिवसेनेचे भरत पिंपळे यांचा 86 मतांनी पराभूत केला असून भरत पिंपळे यांना 1475 मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता व भरत पाटील यांना काही गटाचा विरोध असताना देखील याबाबत कोणताही ठोस तोडगा न काढताच बालेकिल्ला असल्याच्या मस्तीत दुर्लक्ष केले.

Palghar ZP
अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

मात्र, याच नेत्यांच्या मुजोर वागणुकीला मतदारांनी नाकारले असून बालेकिल्ला असलेला गड ढासळला असून कधी न दिसणारे राष्ट्रवादीचे घड्याळ वाजू लागले. जिल्हा परिषद अध्यक्ष राहत असलेल्या सालवड गावात येथील शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या गिरीश राऊत यांच्या पत्नी तनुजा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. याठिकाणी भाजपच्या मेघा पाटील 1822 मतांनी विजयी झाल्या असून 445 मतांच्या फरकाने शिवसेनेच्या तनुजा राऊत यांचा दणदणीत पराभव केला. तनुजा राऊत यांना 1377 मते मिळाली आहेत. याठिकाणी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहत असताना देखील शिवसेनेला मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला. यामुळे शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे संकेत तर मिळतच आहेत. पण, त्याच बरोबर आता येथील जिल्हाप्रमुख बदलही वेग येणार आहे.

Related Stories

No stories found.