अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मुंबकेतील बंगल्यात भरणार शाळा!

या बंगल्याचे नामकरण चित्रगुप्त भवन, असे करण्यात आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मुंबकेतील बंगल्यात भरणार शाळा!
Dawood Ibrahim's bungalowSarkarnama

खेड (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील मुंबके येथील दाऊद इब्राहीमच्या मालमत्तेची नामोनिशाणी आता पुसली गेली आहे. अॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केलेल्या या बंगल्याचे नामकरण चित्रगुप्त भवन, असे करण्यात आले. येथे लहान मुलांसाठी शाळा सुरू होणार आहे. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू होणार असून, यासाठी सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. सनातन पाठशाळा सुरू करण्याबाबतचा फलकही लावण्यात आला आहे, अशी माहिती स्वतः अॅड. श्रीवास्तव यांनी दिली. (School to be filled in the bungalow of underworld don Dawood Ibrahim!)

कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव असलेल्या मुंबके येथील दुमजली बंगल्याची ११ लाख ३० हजारांची बोली लावत विकत घेणाऱ्या दिल्लीतील अजय श्रीवास्तव यांनी येथील तहसील कार्यालयात रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्तेचा ताबा घेतला आहे. दाऊद इब्राहीमचा मुंबके येथील दुमजली बंगल्याचे नूतनीकरण करून येथे लहान मुलांसाठी शाळा, संस्कार वर्ग सुरू होणार आहे. लवकरच सुरू होणाऱ्या शाळेमुळे दाऊद इब्राहीमची सारी ओळख कायमची पुसली जाणार आहे.

Dawood Ibrahim's bungalow
कितीही अफवा पसरावा; जनता रामदासभाईंच्या पाठीशी : ऑडीओ क्लिपप्रकरणी मुलाकडून पाठराखण

दाऊदच्या मुंबकेतील इमारत, सहा जमिनी, आंबा कलम बाग व लोटे येथील एक येथील एक जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात गेली होती. या सर्व मालमत्तांचे अॅटी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकन व मूल्य निर्धारण करण्यात आले होते. गतवर्षी १० नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मालमत्तेचा लिलाव झाला होता. श्रीवास्तव यांनी सर्वाधिक बोली बोलून ती मालमत्ता मिळवली होती.

Dawood Ibrahim's bungalow
भाजपच्या नाराज गटाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा शब्द; तर फडणवीसांचा अध्यक्ष बदलाचा निरोप

ॲड. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात रजिस्टरबाबतच्या साऱ्या प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केलेल्या सर्व मालमत्तेचा ताबा घेतला. यानंतर खरेदी केलेल्या बंगल्याचे नामकरण चित्रगुप्त भवन असे केले. तसेच, सनातन पाठशाळा सुरू करण्याबाबतचा फलकही लावण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.