नीतेश राणेंच्या अटकेसाठी 'फिल्डींग'; सातपुतेला दिल्लीत अटक

नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून भाजप आमदार नीतेश राणे दिल्लीला जाऊ शकतात, त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळाशी संपर्क साधून त्याठिकाणीही त्यांना ताब्यात घेण्यासाठी 'फिल्डींग' लावली आहे.
nitesh rane  

nitesh rane  

Sarkarnama

सिंधुदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. दरम्यान, भाजप आमदार नीतेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. नीतेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदूर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सचिन सातपुतेच्या करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिवसेनेने भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांना रविवारी तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावलं होतं. मात्र, नीतेश राणे चौकशीला आले नाहीत.

त्यानंतर नीतेश राणे यांच्या घरीही सिंधुदूर्ग पोलिस गेले मात्र त्याठिकाणीही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून भाजप आमदार नीतेश राणे दिल्लीला जाऊ शकतात, त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळाशी संपर्क साधून त्याठिकाणीही त्यांना ताब्यात घेण्यासाठी 'फिल्डींग' लावली आहे.

आज मुंबईत विधान भवनात भाजप आमदार नीतेश राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नीतेश राणे यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकतं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नीतेश राणे यांनाही अटक होणार का..? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागल आहे. अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. आणि जर करायची असेल तर विधानसभेत आधी परवानगी घ्यावी लागते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात (Sindhudurg District Bank Election) १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Santosh Parab half murder case) झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी सलग दोन दिवस नितेश राणेंची पोलिस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली होती.

<div class="paragraphs"><p>nitesh rane&nbsp;&nbsp;</p></div>
अमित शहांची घोषणा ; महाराष्ट्र नव्हे; 'हे' राज्य सुशासनात नंबर वन

आता शिवसेना देखील आमदार नितेश राणे यांच्या अटकेसाठी आग्रही झाली आहे. राणे यांचे राजकीय विरोधक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला (Santosh Parab half murder case) जबाबदार असलेल्या लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पण मुख्य सुत्रधारापर्यंत पोलिस पोहचत नाहीत. यात मुख्य सुत्रधार म्हणून नितेश राणेंचे (Nitesh Rane) नाव घेण्यात आले आहे. त्यांना दोन वेळा पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलावून चौकशी केली, पण स्टेटमेंट घेवून त्यांना सोडून देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com