राणेंची खेळी! संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपीच बसवला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
Santosh Parab Become Chairman of Sindhudurg District Bank
Santosh Parab Become Chairman of Sindhudurg District BankSarkarnama

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) अध्यक्षपदी भाजपचे (BJP) मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दळवी हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात दळवी हे आरोपी आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. याच प्रकरणात मनीष दळवी हे आरोपी आहेत. त्यांच्याही जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या गुन्ह्यात अटकेपासून कोणतेही संरक्षण नसल्याने ते अडचणीत आले आहेत. राणेंनी दळवींना आता बँकेच्या अध्यक्षपदी नेमण्याची खेळी खेळली आहे. त्यांनी यातून शिवसेनेला डिवचल्याचे मानले जात आहे. (Santosh Parab Become Chairman of Sindhudurg District Bank)

महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डॉन्टस आणि उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिले. ही प्रक्रिया जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात पार पडली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर राणेंच्या उमेदवारांनी यात बाजी मारली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकाने पराभव केला. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि अर्ज केला होता. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. राणेंनी जिल्हा बँकेत सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होताच नारायण राणे हे जिल्हा बँकेत दाखल झाले. त्यांनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले.

Santosh Parab Become Chairman of Sindhudurg District Bank
पुन्हा राणेंचीच हवा! जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दळवी तर उपाध्यक्षपदी काळसेकर

जिल्हा बँकेत नारायण राणे यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीला (MVA) 8 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात राजन तेलींना पराभूत करून सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

Santosh Parab Become Chairman of Sindhudurg District Bank
शंभर आमदार भाजपमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

आमदार वैभव नाईक यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बँक नसल्याचे या निकालातून समोर आले होते. याआधी ते दोनदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रिक केली आहे. राणे यांना तेली यांच्या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in