'जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे थांबायचं नाही': संभाजीराजेंचा अप्रत्यक्ष निशाणा

Sambhaji Chhatrapati| किल्ले रायगडावर आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यां हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.
'जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे  थांबायचं नाही': संभाजीराजेंचा अप्रत्यक्ष निशाणा
Sambhaji Chhatrapati

रायगड : किल्ले रायगडावर आज युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यां हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त रायगडावर लाखो शिवप्रेमी दाखल झाले होते. शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येलाच संभाजीराजे छत्रपती रायगडमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीपासून सुरु झालेल्या अनेक घडामोडींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. (Sambhaji Raje Chhatrapati latest news)

- युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले...

''आज हा राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना मला सरकारला एकच सवाल विचारायचा आहे की तुम्ही शिवभक्तांसाठी काय केलं?? आम्ही इथे रायगडावर पाण्याची सोय केली, इथे बाकी काय हवं नको तेही आम्ही पाहिले, मग तुम्ही काय केलात? त्यामुळे स्वराज्याची सुरुवात याच रायगड वरून केली पाहिजे, असं मला वाटतं.''

Sambhaji Chhatrapati
आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षाला बेदम मारहाण

''आज राज्याभिषेक सोहळा असताना मी या राज सदरेवरून कोणतेही राजकीय विधान करणार नाही. अनेकांना वाटले होते की मी काय बोलेन पण राज सदर ही राजकीय विधाने करण्याची जागा नाही. मी या रायगड समितीचा अध्यक्ष आहे. मला जर सांगितले की उद्या राजीनामा दे तर मी लगेच देईन. कारण मला फरक पडत नाही.''

''मुघल दरबारात अपमानित झाल्यानंतर जेव्हा शिवजी महाराज तिथून निघून गेले. आम्हीही त्यांचेच वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो. शिवाजी महाराज यांनी सांगितले होते कि जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे आपण थांबायचं नाही,'' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शाहू महाराज छत्रपती यांच्या नाराजीनंतर इतिहासातील किस्सा सांगून नाव ना घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर निशाणा साधला. '' जेव्हा आदिलशहाने शहाजी राजे यांना पत्र लिहून शिवाजी महाराज यांना आवर घालावा असे सांगितले, तेव्हा शहाजी राजे यांनी पत्र लिहून, शिवाजी राजे आमचं ऐकत नाहीत, तुम्हीच काय ते बघा, आदिलशहाला उत्तर दिले. त्यामुळे आम्ही कोणासमोर झुकणार नाही आणि आपण आता स्वराज्य निर्माण करायचे आहे,'' असा विश्वासही यावेळी संभाजी राजे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in