Ratnagiri News : साई रिसॉर्ट प्रकरण : सदानंद कदमांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sai Resort Scam : साई रिसॉर्ट प्रकरणी दापोलीतील बड्या अधिकाऱ्याला अटक
Sadananda Kadam
Sadananda KadamSarkarnama

Sadananda Kadam : रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. त्यानंतर ईडीने त्यांची कोठडी वाढवून मागितली.

मात्र, न्यायालयाने ईडीची मागणी फेटळत सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर दुसरीकडे या साई रिसॉर्ट प्रकरणीच आज तिसरी अटक करण्यात आली आहे.

Sadananda Kadam
PCMC News : AH3N2 चा पिंपरी-चिंचवडमध्ये बळी; प्रशासन सतर्क, अधिवेशनसोडून आमदार धावले मतदारसंघात

याआधी सदानंद कदम, जयराम देशपांडे यांना अटक झाली होती. तर आज सुधीर पारदुले यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याच्या आरोपानंतर जयराम देशपांडे यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्या आधी सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

Sadananda Kadam
Pimpri-Chinchwad : कोरोना असतानाच 'स्वाईन फ्लू'ही परतला; पिंपरी-चिंचवडमध्ये गेला पहिला बळी

सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. त्यानंतर ईडीने त्यांची वाढवून मागितलेली कोठडीची मागणी न्यायालयाने फेटळली. तसेच सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

दरम्यान, सदानंद कदम हे अनिल परबांचे व्यावसायिक भागीदार असल्याच सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनिल परबांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com