गाळेधारकांकडून ५० लाखांची लाच घेणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकाचे पद रद्द

ठरावावेळी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर मात्र चिडीचूप बसण्याची वेळ आली होती.
congress
congresssarkarnama

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका आणि नगरसेवकांची प्रतिमा खराब करणारे काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विशेष महासभेत नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, गटनेते विलास पाटील यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या मित्रपक्षाकडूनच ही मागणी करण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील अनधिकृत गाळेधारकांकडून ५० लाखांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले होते. (Resolution to cancel the post of Congress corporator's in Bhiwandi)

भिवंडी शहरातील पद्मानगर येथील भाजीपाला मार्केट येथे 100 दुकाने अनाधिकृतपणे बांधण्यात आले आहेत, ती तोडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महापालिकेकडे तक्रारी अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदारांकडे त्यांनी दोन करोड रुपयांची मागणी केली होती, त्यामुळे सर्व दुकानदार घाबरले होते. त्यांनी विनंत्या करूनसुद्धा कामूर्ती यांनी पैशासाठी तगादा लावला होता, त्यामुळे तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत (ACB) प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. सर्व माहिती व पडताळणीनंतर 50 लाख रुपयांची लाच घेताना कामूर्ती यांना चार दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

congress
मोठी बातमी : ‘इन्कम टॅक्स’कडून एकाही साखर कारखान्यावर कारवाई होणार नाही

या गंभीर प्रकारामुळे महापालिका व नगरसेवकांची प्रतिमा मलीन झाली आहे. महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तातडीने काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कामूर्ती यांचे मुंबई महापालिका अधिनियम 10 प्रमाणे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, कोनार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील, नीलेश चौधरी, उपमहापौर इमरान खान, संजय म्हात्रे यांच्यासह सभागृहातील मान्यवर नगरसेवकांनी केली आहे.

congress
नाना पटोलेंनी मित्रांकडे जबाबदारी दिली अन्‌ काँग्रेसमध्ये वादळ उठले!

सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौर पाटील यांनी हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले, तर आयुक्त देशमुख यांनी कामूर्ती यांचे पद रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांवर मात्र चिडीचूप बसण्याची वेळ आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com