‘मर्दाची अवलाद असला तर आमदारकीचा राजीनामा द्या; तुम्ही सच्चे की बदमाश हे जनता ठरवेल’

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळेच आपले सण आज चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama

चिपळूण : तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर आमदारकीचा (MLA) राजीनामा द्या. तुम्ही सच्चे आहात की बदमाश, हे जनतेला ठरवू द्या. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही कोण आहात ते जनता ठरवेल, अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले. (Resign from MLA : Bhaskar Jadhav's challenge to shivsena rebel MLAs)

शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल भास्कर जाधव यांचा गुहागर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकारने आमचे सरकार आले आणि सण सुरू झाले असे बोर्ड लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळेच आपले सण आज चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत. उलट कोरोना काळात मुंबईकरांनी गावाकडे येऊ नये, अशीच भूमिका येथील भाजप नेत्यांनी घेतली होती, असा आरोपही जाधव यांनी केला.

Bhaskar Jadhav
‘दामाजी’च्या सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळला; ऐन सणासुदीत दिली उसबिलाची रक्कम!

जाधव म्हणाले की, शिवसेना व ठाकरे हे अतूट नाते आहे, ते कोणीही तोडू शकत नाही. भाजपला तुम्ही फक्त सत्तेपुरते हवे आहात. सर्वधर्मसमभावाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, म्हणूनच आज मुस्लिम समाज आमच्या सोबत येत आहे व हेच वातावरण भाजपला अस्वस्थ करत आहे. त्यामुळेच कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्न केला. इतर पक्षातील लोकांवर भ्रष्टाचारचे आरोप, ईडी चौकशीनंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. भाजपमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. काम करूनही मागे बसावे लागत आहे व इतर पक्षातील पुढे जात आहेत, अशी त्यांच्यामध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे.

Bhaskar Jadhav
शहाजीबापूंसाठी एकनाथ शिंदेंनी सोडला हात सैल; पाणी योजनेस ३०० कोटी निधीची मान्यता

‘देशात ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आली, त्या त्या राज्यात भाजपने दंगली घडवल्या, हा इतिहास आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत, त्यामुळेच मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप दंगली घडवण्याचा धोका आहे. हे शेवटचे अस्त्र भाजप वापरण्याची शक्यता आहे.

Bhaskar Jadhav
...तर अजितदादांनी सगळी शिवसेना खाऊन टाकली असती : रामदास कदमांचा आरोप

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मी गणेशोत्सवानंतर भेटणार आहे. माझ्याकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्या जाणून घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन रायगड जिल्ह्यातून राज्य दौऱ्याची सुरुवात करणार आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com