पालकमंत्री परबांना हटवा; शिवसेना पदाधिकारी आक्रमक

अनिल परब फक्त दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळी ते जिल्ह्यात दिसत नाहीत.
Anil Parab Latest News
Anil Parab Latest NewsSarkarnama

रत्नागिरी : शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पार पडलेल्या बैठकीत पाच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (Shivsena) नेते परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. (Anil Parab Latest News)

पालकमंत्री परब हे फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळी ते जिल्ह्यात दिसत नाहीत. ते राष्ट्रवादी काँग्रेसला कामं देतात आणि शिवसेनेच्या लोकांना डावलतात. यामुळे पालकमंत्री म्हणून परबांना हटवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मात्र, रत्नागिरी शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, याबाबत शिवसेनकडून कोणत्याही नेत्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Anil Parab Latest News
सदावर्तेंकडून एसटी कष्टकरी जनसंघाची घोषणा; राष्ट्रवादीला देणार टक्कर

गेल्या काही दिवसांपासूनच रत्नागिरी शिवसेनेतली अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही काही दिवसांपूर्वी परबांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले होते. यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली होती. आता पु्न्हा तश्याच प्रकारचा आरोप रत्नागिरी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा पुढे आला.

येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू होत असल्याने यासंदर्भात आज (ता.9 मे) चिपळूणमधील पुष्कर हॉल येथे शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत पाच तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत परबांना थेट पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

Anil Parab Latest News
लंका पेटली! हिंसाचारानंतर पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा

परबांवर करण्यात आलेल्या आरोपमध्ये परब हे राष्ट्रवादी काँग्रेसला कामं देतात आणि शिवसेनेच्या लोकांना डावलतात आहेत. ते फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळी ते जिल्ह्यात दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी पक्ष निरीक्षक सुधीर मोरे आणि शरद बोरकर यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 4 तास पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री परब आणि उदय सामंत यांच्या बद्दलच्या नाराजीचा सूर दिसून आला. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Anil Parab Latest News
`मी जास्त काही लिहिले तर राजकीय भूकंप होईल`

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदमांनी परबांवर पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप केले होते. परब हे शिवसेनेच्या विरोधकांना मदत करून शिवसेनेला कमजोर करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याकडे लक्ष घालावं आणि शिवसेना वाचवावी, अशी मागणी केली होती आणि आपण शेवटपर्यंत शिवसेना सोडणार नाही. पण मुलांच्या भविष्यासाठी वेगळा निर्णय घेतला तर काही सांगू शकत नाही, असा इशारा दिला होता. या आरोपांवर परबांनी उत्तर देण्याचे टाळले होते. मात्र, आता तसेच काही आरोप पदाधिकाऱ्यांनी केल्याने परबांची पंचाईत होवू शकते. याप्रकरणी शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com