पक्षविरोधी काम केल्याने राणे समर्थकाची भाजपमधून हकालपट्टी!

दोडामार्ग भाजपमध्ये असलेले अंतर्गत वाद नुकत्याच झालेल्या तेथील नगरपंचायत व सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी चव्हाट्यावर आला होता.
Rajendra Nimbalkar
Rajendra NimbalkarSarkarnama

सावंतवाडी : दोडामार्ग भाजपमध्ये (bjp) अंतर्गत कलह सुरू असताना आज (२५ एप्रिल) जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना सहा वर्षांकरिता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी केली. तसे पत्रही त्यांना देण्यात आल्याचे दोडामार्ग भाजप प्रभारी महेश सारंग यांनी सांगितले. राजेंद्र निंबाळकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे (Narayan-Rane) समर्थक म्हणून ओळखले जायचे. (Rane supporter Rajendra Nimbalkar expelled from BJP for working against party)

दोडामार्ग भाजपमध्ये असलेले अंतर्गत वाद नुकत्याच झालेल्या तेथील नगरपंचायत व सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी चव्हाट्यावर आला होता. माजी उपसभापती असलेल्या निंबाळकर यांच्यावर जिल्हा बँकेत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यावरूनच हे निलंबन झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.

Rajendra Nimbalkar
'हे कुठले घंटाधारी हिंदुत्ववादी...यांचा एकदाच सोक्षमोक्ष लावतो'

निंबाळकर यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, भाजपचे सदस्य या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना आपल्याकडून पक्षहिताच्या कामाची अपेक्षा होती. मात्र, आपल्याकडून पक्षविरोधी काम झाले. अत्यंत प्रतिष्ठेच्या जिल्हा बँक निवडणुकीतही विरोधी पक्षाला मदत होईल, अशा पद्धतीने काम केल्याचे निदर्शनात आल्याचे म्हटले आहे. पक्षविरोधी काम केल्याबाबत पक्षीय निलंबनाची कारवाई का करू नये, याबाबत आपल्याला सात दिवसांत खुलासा करण्यासाठीचे पत्र देण्यात आले होते. या मुदतीत आपल्याकडून खुलासा आलेला नाही. यामुळे निलंबन कारवाई करण्यात आल्याचे पत्रात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले आहे.

Rajendra Nimbalkar
दादागिरी करून याल तर.... : उद्धव ठाकरेंचा राणा दांपत्यास इशारा

दरम्यान, निंबाळकर हे राणे समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी काँग्रेस, भाजपमध्ये असताना पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे. दोडामार्ग भाजपमध्ये असलेल्या गटबाजीचे याआधीही दर्शन झाले होते. या निलंबन कारवाईनंतर दोडामार्ग तालुक्यात काय राजकीय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in