Rane-Shivsena Politics : राऊतांना पुन्हा जेलमध्ये टाकणार; नारायण राणेंचा खुला इशारा

९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
Sanjay Raut, Narayan Rane 
Sanjay Raut, Narayan Rane sarkarnama 

Kokan Politics : "मी 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार ," असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. राणे कणकवली पर्यटन महोत्सव 2023 बोलत होते.

संजय राऊतला सोडणार नाही : नारायण राणे

"26 डिसेंबरच्या सामनातील अग्रलेखाची सर्व कात्रणे माझ्याकडे आहे. मी ती वकिलाकडे पाठवून ठेवली आहेत. मी वाचून विसरणारा नाही. संजय राऊत यांना सोडणार नाही. तर त्यांच्यावर केस करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्यांना परत जावंसं वाटतयं. म्हणून रस्ता मोकळा करुन देत आहे." असा इशाराच राणेंनी दिला आहे.

Sanjay Raut, Narayan Rane 
MNS News : मुंबईतील चित्रनगरी उत्तरप्रदेशात जाणार का ? ; योगी आदित्यनाथांना मनसेनं सुनावलं

वाचा,काय लिहिलं होतं 26 डिसेंबरच्या सामनातील अग्रलेखात ?

ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली 26 डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, "सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते."

संजय राऊत 102 दिवस तुरुंगात

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. जवळपास 102 दिवस तुरुंगात काढल्यानंतर गेल्या महिन्यात 9 नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून संजय राऊत यांची सुटका झाली. राऊत यांना जामीन देताना विशेष पीएमएलए न्यायालयाने आपल्या जामीन आदेशात, 'संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर होती,' असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटलं होतं.

दरम्यान, नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांनीदेखील त्यांच्या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे. 'आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. धाडसाच्या गोष्टी कोणी बोलाव्यात, आतापर्यंत मी त्यांच्यावर काहीच बोललो नाही, एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या. मला जेल मध्ये टाकायला कायदा तुमच्या हातात आहे का, असा सवाल करत राऊत यांनी राणेंना उत्तर दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com