काही तासातच राणे बॅकफूटवर : म्हणाले कोणतेही राजकारण करणार नाही
Narayan Ranesarkarnama

काही तासातच राणे बॅकफूटवर : म्हणाले कोणतेही राजकारण करणार नाही

बऱ्याच वर्षाने हा योग आला आहे.

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र, काही तासातच राणे बॅकफूटवर गेले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतेही राजकारण करणार नाही. या कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Narayan Rane
भाजपचं अस्तित्व ईडी, आयटीत दिसते ते कश्मीर खोऱ्यातही दिसावं

राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणतेही राजकारण करणार नाही. राजकारण केले जाणार नाही. कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, असे विचारले असता राणे म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला आहे. हा योग पुन्हा कधी येईल का? असे विचारले असता राणे म्हणाले, ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे राणे म्हणाले. शिवसेनेवर प्रहार करणार का, असे विचारले असता प्रहार करताना कोण सांगते का? जो समोर असतो त्याच्यावर प्रहार होत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Narayan Rane
दम असेल तर एकटं-एकटं येऊन लढा ; दानवेंचे आघाडीच्या नेत्यांना आव्हान

निमंत्रण पत्रिकेत नारायण राणे यांचे नाव बारीक अक्षरात लिहिण्यात आले आहे. त्यावरुन शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली होती. त्यावर राणे म्हणाले, माझ्याकडे सुक्ष्मच नाही तर लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. 80 टक्के उद्योग माझ्या हातात आहे. हे काही लोकांना कळत नाही. विमानतळाचे उद्घाटन आज (9 ऑक्टोबर) दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.