हितेंद्र ठाकूरांच्या तीन मतांसाठी रामराजेंची दोन तास `बॅटिंग`

हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रिघ
हितेंद्र ठाकूरांच्या तीन मतांसाठी रामराजेंची दोन तास `बॅटिंग`
Ramraje-Hitendra Thakursarkarnama

विरार : राज्यसभेच्या निवडणुकीत निवडणुकीच्या शेवटच्या दिवस पर्यंत आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवणारी बहुजन विकास आघाडी आणि त्याचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी पुन्हा एकदा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपले पत्ते `ओपन` केले नाहीत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यानंतर भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक सांळुके यांनी ठाकूर यांची भेट घेतल्यानंतरही ठाकूरांनी स्पष्टपणे त्यांना काही सांगितले नसल्याचे समजते. आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत काटे कि टक्कर होणार असल्याने एकेका मतांसाठीची जमवाजमव करण्यासाठी सारेजण कामाला लागले आहेत. त्यात हि अपक्ष आणि छोट्या पक्षांचा भाव वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्षांबाबत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशयाने पाहण्यास सुरुवात केल्याने या अपक्षांची पुन्हा मनधरणी करण्यात येत आहे.

Ramraje-Hitendra Thakur
'बविआ'ची मते कुणाला...नार्वेकर अन् लाड स्वागताला गेले पण ठाकूरांनी कुणाचं ऐकलं?

यासाठी आता काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरार येथे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. बहुजन विकास आघाडीकडे तीन मते असल्याने त्यांचे महत्व वाढले आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आणि नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर हे अचानकपणे न्यूयार्कला गेल्याने एक मताचा प्रश्न उभा राहणार आहे. क्षितिज ठाकूर कधी येणार याबाबतही रामराजे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या मध्ये चर्चा झाल्याचे समजते. अर्थात या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार एकनाथ खडसे हे मात्र उपस्थित नव्हते.

Ramraje-Hitendra Thakur
कौशल्य कोणाकडे आहे ते विधान परिषद निवडणुकीत कळेल : अजित पवारांचे भाजपला आव्हान

``1995 पासून निंबाळकर आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत. निवडणूक असल्याने त्यांनी पाठिंबा मागितला आहे. क्षितिज आमच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याने न्यूयार्कला गेले आहेत समाजकारण करताना घर आणि त्यातील नातीही जपायला लागतात. बघू कसे होते ते. शेवटी इथे काय तर चार हुशार लोक आम्हाला घोडाबाजार यावर चर्चा करायला लावतात. त्यापेक्षा नाही दिले एक मत तर काय होणार आहे, असा प्रतिप्रश्न ठाकूर यांनी पत्रकारांना केला.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य शिवसेनेच्या अंगलट येणार असल्याचे ठाकूर यांच्या या वक्तव्यातून दिसते. या भेटीबाबत रामराजे यांनी सांगितले कि हितेंद्र ठाकूर आणि मी 1995 पासून एकत्र काम करत आहे. तेही त्यावेळी अपक्ष होते आणि मीही अपक्ष होतो. तेव्हापासून आमची मैत्री आहे. आज ख्यालीखुशाली विचारायला आलो होतो. ठाकूर बरोबर मस्त जेवलो आणि आता निघालो. निंबाळकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Ramraje-Hitendra Thakur
विधान परिषद निवडणुकीची समीकरणे सांगलीत जुळणार? : जयंतरावांच्या गाडीत संजयकाका....

संजय राऊतही भेटायला येणार

बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची नावे घेऊन संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीनंतर टीका केली होती. आमदार हितेंद्र ठाकूर , क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी महाविकास आघाडीला मतदान केले नसल्याची सांगितले होते. संजय राऊत यांच्या टीकेची दखल शरद पवार यांनी अपक्षावर अशी टीका करू नये असे सांगितले होते. तर आता क्षितिज ठाकूर हे राज्यसभा निवडणुकी नंतर थेट न्यूयार्कला गेल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे स्वतः हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in