रामदास कदमांच्या हातातून दापोलीपाठोपाठ मंडणगडही जाणार

मंडणगडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार अशी चिन्ह आहेत.
ramdas kadam
ramdas kadamsarkarnama

रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीत शिवसेना बंडखोरांना फक्त २ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (shivsena)नेते रामदास कदम (ramdas kadam)पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कारण दोन अपक्ष नगरसेवकांच्या साथीने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाचा एकूण ९ नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन केला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे मंडणगडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणार अशी चिन्ह आहेत.

शिवसेना पक्षनेतृत्वाबाबत रामदास कदम यांनी अनेकदा यापूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांच्याहातून मंडणगणचीही सत्ता जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता येणार आहे. तर मंडणगडमध्ये नाराज कदम यांच्या बंडखोरांनी ७ जागा जिंकत पक्षाला चांगलंच आव्हान दिलं. यंदाच्या झालेल्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत दिलं नाही.

ramdas kadam
राठोडांनी दाबलेला चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी लोहारांनी काढला बाहेर

आता शिवसेना-राष्ट्रवादी युतीने मंडणगडमध्ये तीन अपक्षांपैकी दोन अपक्षांचा पाठींबा मिळवण्यात यश मिळवलं आहे. दोन नगरसेवकांच्या साथीने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना नगरसेवकांनी दिलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रकाश शिगवण उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत मंडणगड नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.

ramdas kadam
महादेव जानकरांनी प्रचारसभा घेऊनही रासपच्या उमेदवाराला मिळाली शून्ये मते!

राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या, शिवसेनेची पाटी यंदाच्या निवडणुकीत कोरी राहिली, तर नाराज कदम समर्थक ७ जागांवर निवडून आले. ३ अपक्ष निवडून आल्यामुळे सत्तेच्या चाव्या या अपक्षांच्या हाती होत्या. या तीन अपक्ष नगरसेवकांपैकी सोनल बेर्डे आणि रेश्मा मर्चंडे यांनी राष्ट्रवादीच्या गटाला आपला पाठींबा दिला आहे.

रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना डावलण्यात आल्यामुळे कदम समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातच रामदास कदम यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्लाबोल केला. रामदास कदम-अनिल परब यांच्यातील विस्तव अजून गेलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com