शिवसेनेच्या आजच्या सभेला उपस्थित न राहण्याचे रामदास कदमांनी सांगितले कारण...

Shivsena|Ramdas Kadam| गेल्या काही महिन्यांपासून रामदास कदम शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Ramdas Kadam| Shivsena|
Ramdas Kadam| Shivsena|

Ramdas Kadam latest political news

रत्नागिरी : ''माझी तब्येत ठीक नसल्याने आपण या सभेला जावू शकणार नाही. पण कुणी कितीही अफवा उठवल्या तरी तरी मरेपर्यंत गद्दारीचा डाग लागू देणार नाही. शिवसेना हे आमचे कुटुंब, एक घर आहे आणि मी शिवसेनेत (shivsena) पुर्ण समाधानी आहे, पण मणक्याचे दुखणे असल्याने मला आजच्या सभेला उपस्थित राहता येणार नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. तसेच आतापर्यंत मी आणि माझ्या मुलांनी शिवसेनेसाठी काम केलं आणि यापुढेही करत राहतील, भविष्य़ात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शब्दाच्या बाहेर नसेन, कधीच नसेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (१४ मे) बीकेसीमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेच्या इतर नेत्यांप्रमाणेच रामदास कदम यांनाही या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Ramdas Kadam| Shivsena|
राष्ट्रवादी युवकने दिली भाजप विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार

मात्र गावातील मंदिरात सप्ताह कार्यक्रमामुळे आपण सभेला येणार नसल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे. पण, 'जिवंत असेपर्यंत मी भगव्याची साथ सोडणार नाही. गावातल्या मंदिरातील सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे', असे त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व मोठ्या सभांना सर्व शिवसेना नेत्यांची उपस्थिती असते. रामदास कदम यांचेही भाषण आज होणार होते. शिवसेना सोडून गेलेले रामदास कदम यांच्या निशाणाण्यावर असतात. रामदास कदम जोरदार टोमणे मारत असल्याने सभेमधून त्यांना जोरदार प्रतिसादही मिळत असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रामदास कदम शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशावेळी आजच्या जाहीर सभेचे निमंत्रण रामदास कदम यांना स्वत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पाठवले होते. मात्र तब्येत ठिक नसल्याचे सांगत त्यांनी सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

या सभांमध्ये शिवसेना नेतृत्वाबरोबरच इतर नेत्यांचीही भाषणे होतात. कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच वर्षात एकदाही शिवसेनेची मैदानात सभा झाली नव्हती. त्यानंतरही आजारपणामुळे मुख्यमंत्री गेले अनेक दिवस सभा घेऊ शकले नाहीत. मात्र ऑनलाईन बैठका, सभांना ते आवर्जुन उपस्थित राहायचे. मात्रे गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेचा संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच मनसेने दिलेले आव्हान, राणा दांपत्याचे स्टंट यासर्वं घडामोडींना उत्तर देण्यासाठी आजची सभा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com