Kokan Politics : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर आगपाखड; म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होत आहे.
Kokan Politics :
Kokan Politics :Sarkarnama

Kokan Politics : ''खेडमधल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझ्या हातात काही नाही,मी रिकाम्या हाताने आलोय.पण अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना ते देऊ शकले असते, पण तेही त्यांनी दिलं नाही, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी आज (१९ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची खेडमध्ये सभा होत आहे. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मतदारसंघातच ही सभा होणार आहे. दरम्यान या सभेपूर्वीच कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Kokan Politics :
Santosh Bangar News: आमदार बांगरांची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

खेडमधली ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा असेल आणि सर्व टीकाकारांना या सभेतून उत्तर दिलं जाईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.तसेच सभेपूवीच कदम यांनी कोटेश्वरी मानई देवीकडे साकडं घातलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये येत आहेत. त्यांनी माझ्या कोकणासाठी काहीतरी देऊन जावं, ही राजकीय सभा नको, तर या सभेचा माझ्या कोकणातील जनतेला लाभ व्हावा, असं रामदास कदमांनी देवीला साकडं घातलं आहे.

तसेच, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी अनेक चांगले निर्णय घेतले.केंद्रातून पैसा आणून महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेत आहेत.तसा माझा कोकणाचाही विकास व्हावा, कोकणही विकासापासून लांब राहू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com