Ramdas Kadam : रामदासभाईंना संपवण्याचं कट-कारस्थान मोतोश्रीवर रचलं गेलं : योगेश कदमांचा ठाकरेंवर घणाघात!

Yogesh Kadam : "जगातला पहिला पक्षाध्यक्ष ज्यांनी आपल्याच आमदाराला संपवायला निघाले.."
Ramdas Kadam : Yogesh Kadam : Uddhav Thackeray
Ramdas Kadam : Yogesh Kadam : Uddhav Thackeray Sarkarnama

Kokan News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा होत आहे . याआधी उद्धव ठाकरे यांची याच ठिकाणी सभा झाली होती. तेव्हा ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.आता एकनाथ शिंदे यांचीही त्याच ठिकाणी आणि त्याच मैदानावर जाहीर सभा आहे. या सभेतून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.

योगेश कदम म्हणाले, "मी निवडून आल्यानंतर योगेश कदम संपेल यासाठी प्रयत्न सुरू होते. नेते म्हणून रामदासभाईंना संपवण्याचं कट कारस्थान मातोश्रीमधून रचलं जात होतं. रामदासभाईनंतर त्यांच्या मुलाने संपलं पाहिजे म्हणून प्रयत्न सुरू होते. वारंवार आमच्या वरती अन्याय. जगामधला असा कोणता पक्ष नसेल, कि अध्यक्षच आमदाराला संपवायला निघाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं,हा य़ोगेश कदम आज या मंचावरून बोलायला थांबला नसता," अशी घणाघाती टीका कदम यांनी केली.

Ramdas Kadam : Yogesh Kadam : Uddhav Thackeray
Pankaja Munde News : पंकजा मुंडे मार्गदर्शन करत होत्या, इतक्यात 'कमळ' पडलं, काय नेमकं घडलं?

"सगळं बघितलं आम्ही, सगळं अनुभवलं. कोकणातली शिवसेना संपली असती, कोकणाचा विकास कुंठला असता. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दापोलीतल्या शिवसैनिकांनी केलं. येथे शिवसेनेला सपवून राष्ट्रवादी वाढवण्याचं काम सुरू होतं. रामदास कदमांपाठोपाठ योगेश कदम यांना संपवण्याचं काम केलं जात होतं.पण मुख्यमंत्री शिंदे यांनी आधार दिला," असे कदम म्हणाले.

"देशातला पहिला असा पक्ष असेल जो आपल्याच आमदाराला संपवण्यासाठी निघाला. सर्व पाहिलं म्ही उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. सहा महिने आम्हावा ते भेटले नाहीत. पत्रकार आम्हाला विचार आहेत. ही उत्तर सभा आहे का ? ही उत्तर सभा नसून जमलेले नागरिकचं उत्तर असतील. जनसमुदाय जमलेला आहे. दापोलीतून कुणाची हिमत नाही, हा भगवा खाली आणण्याची," असेही कदम म्हणाले.

Ramdas Kadam : Yogesh Kadam : Uddhav Thackeray
Eknath Shinde : तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ; शिंदे ठाकरेंना देणार प्रतिउत्तर?

"४८ पंचायती पैकी ३७ पंचायती आमच्या आहेत. उद्धवजी तुम्ही चुकलात आम्हाला डिवचलंत,सभा घेऊन तुम्हचा पराभव नक्की करू. ९० साली शिवसेनेतून रामदास भाई कोकणात आले नसते, तर इथली दादागिरी संपली नसती. आमची बदनामी करणाचा प्रयत्न सुरू आहे. पावसात खेड दयनीय अवस्थेत होता. तेव्हा दुसरं कुणी नाही आलं, पण मुख्यमंत्रीजी आपण आलात मदतही जाहिर केली. जर का हे घडलं नसतं तर हे दिवसही पाहता आले नसेत. आता भास्कर जाधव यांनी त्यांचा मतदार संघ वाचवून दाखवावा," असेही कदम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com