Raj Thackeray : 'शरद पवारांनी कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही' : राज ठाकरेंचा हल्लाबोल!

Raj Thackeray : पवार हे फुले - शाहू - आंबेडकर अशी घोषणा देतात पण..
Raj Thackeray  Sharad Pawar
Raj Thackeray Sharad PawarSarkarnama

सिंधुदुर्ग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरेंनी कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरूवात केली आहे. आज त्यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. शरद पवार हे फुले - शाहू - आंबेडकर अशी घोषणा देतात, परंतु ते कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. त्यांची जुनी भाषणं काढून पहा ते शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांंनी केली.

Raj Thackeray  Sharad Pawar
Adv. Gunaratn Sadavarte : ॲड. सदावर्तेंनी स्थापन केलेला एसटी कष्टकरी जनसंघ फुटीच्या मार्गावर

यावेळी पक्षाच्या संघटनाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, संघटनात्मक विस्कळीतपणा दूर करणं गरजेचं होतं, गटबाजीला चाळण लावणं आवश्यक आहे. याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे. समान नागरी कायदा गरजेचं आहे, तो कायदा संपूर्ण देशासाठी असतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray  Sharad Pawar
Gram Panchayat Election : इच्छुकांनी मानले अजितदादांचे आभार ; निवडणूक आयोगाकडून मोठा बदल

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, जातीपलीकडे इतिहास पाहणं गरजेचं आहे. इतिहासाच्या तथ्यांबाबत आपण इतिहासकारांशी, तज्ञांशी बोलायला हवे. प्रतापराव गुजरांसोबत वेडात दौडलेल्या सात वीरांची नावं ही काल्पनिक आहेत. तसा कोणताही ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही. मात्र महापुरूषांची जात काढणं ही काही ने्त्यांची गरज आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com