Raigad Lok Sabha Constituency : रायगडमध्ये तटकरेंच्या विरोधात 'मविआ'चा उमेदवार ठरला ! अनंत गीते मैदानात ?

Maharashtra Politics : रायगडसाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
Raigad Lok Sabha Constituency
Raigad Lok Sabha Constituency Sarkarnama

Mumbai : रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तटकरेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाने उमेदवार निश्चित केला आहे. रायगड लोकसभेसाठी माजी मंत्री अनंत गीते यांना तयारीला लागण्याच्या सूचना "मातोश्री" वरून देण्यात आल्याचे समजते.

गीते यांनी रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गीते राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे सुनील तटकरे यांच्या विरोधात गीते यांना उमेदवारी दिली जाणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. त्यासोबतच ठाकरे गटाकडून आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन काही ठिकाणचे उमेदवार ठरविले जात आहेत. त्यामध्ये रायगडसाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.

Raigad Lok Sabha Constituency
Pradeep Sharma Grants Bail : अँटिलिया स्फोटके प्रकरण : प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

रायगड लोकसभा मतदार संघात गीते यांचा कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनंत गीते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी रायगडसह मुंबईमध्ये पक्षाचे मेळावे घेत कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे.

गीते यांनी नुकतेच पाली येथील बल्लाळेश्वरांचे दर्शन घेऊन आपल्या निवडणूक प्रचाराला सुरवात केली. पालीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच झाला, त्यावेळी त्यांनी फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये गीते यांनी मेळाव्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी गीते यांनी सुरु केली असल्याचे दिसते.

Raigad Lok Sabha Constituency
Central Government News : सीबीआय अन् ईडीच्या समन्वयासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल ; CIO च्या प्रमुखपदी संजय मिश्रा...

गेल्या काही दिवसात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

रायगडमधून महाविकास आघाडीतर्फे सुनील तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता मानली जात होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. तटकरेंसह राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपबरोबर गेले. त्यामुळे गीते यांचा रायगडमधील लोकसभेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in