राष्ट्रपती रायगडावर येणार कसे? अखेर ठरलं!

राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सॅल्यूट करतो.
president ramnath kovind
president ramnath kovindsarkarnama

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) 6 डिसेंबर रोजी रायगडावर (Raigad Fort) येणार आहेत. रायगडावरील होळीच्या माळावर बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडला काही शिवप्रेमींनी विरोध केला होता. त्याममुळे आता राष्ट्रपती रोपवेने रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

president ramnath kovind
नाना विचारतात; देश विकणाऱ्यांसोबत रहायचं की वाचवणाऱ्यांसोबत?

या संदर्भात संभाजीराजे यांनी ट्विट करुन केले. संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. 'छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिसथितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सॅल्यूट करतो' असे संभाजीमहाराज म्हणाले आहेत.

president ramnath kovind
नगरपालिका आखाड्यात आमदार संदीप क्षीरसागरांची तयारी काय; उपनगराध्यक्ष बंधूही फारसे दिसेनात

रायगडावर नगारखान्याच्या बाजूला होळीचा माळ आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 1996 पर्यंत या पुतळ्याजवळ हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या वाऱ्याने धूळ महाराजांच्या पुतळ्यावर जायची. शिवप्रेमींनी यामुळे आंदोलन करुन हेलिपॅड काढायला लावले होते. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचे निश्चित झाले होते. यानंतर शिवप्रेमींनी विरोध केला होता. शिवप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रपती रोपवेने रायगडावर जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com