हितेंद्र ठाकूरांच्या घरची वर्दळ थांबेना... आता प्रसाद लाडांची पावले वळाली...

हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्याकडे तीन मते असल्याने त्यांचे महत्व वाढले आहे.
Prasad Lad-Hitendra Thakur
Prasad Lad-Hitendra ThakurSarkarnama

विरार : विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC election 2022) अवघे दोन दिवस बाकी असल्याने आज भाजपाचे विधानपरिषद उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. अर्थात लाड यांनी काही वर्षांपूर्वी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या विरोधात केलेली टीका हितेंद्र ठाकूर विसरणार का, असा प्रश्न याठिकाणी बविआचे कार्यकर्ते विचारत होते. त्यामुळे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बहुजन विकास आघाडी कोणाला मत देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (MLC election 2022 updates)

Prasad Lad-Hitendra Thakur
Video: आमची माकडचेष्ठा लावली आहे काय? : आमदार हितेंद्र ठाकूर भडकले

विधान परिषद निवडणुकीतील काॅंग्रेसचे उमेदवार भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठाकूर यांची भेट घेतली. याशिवाय भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही ठाकूर यांची भेट घेतली. इतर नेतेही ठाकूर यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. आता लाड यांनी डावखरे यांच्यासह ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना मत देण्याची विनंती केली. शिवसेनेकडून अद्याप ठाकूर यांना भेटण्यासाठी कोणी आलेले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या पक्षाचे वरिष्ठ नेतेही ठाकूरांना गळ घालणार असल्याचे समजते.

Prasad Lad-Hitendra Thakur
`घोडेबाजार` म्हणून आरोप करणाऱ्या संजय राऊत यांचा `यू टर्न!`.. निघाले विरारकडे!

मी निवडणुकीचा उमेदवार असल्याने हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मागण्यांसाठी आलो, असे लाड यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर निवडणुकीसाठी मत मागणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. त्याप्रमाणे भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते मत मागण्यांसाठी आले होते. मत कोणाला देणार हे सांगायचे नसते. त्यामुळे आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ आणि मतदान करू मत देताना वसई विरारच्या विकासाचा विचार करणार आहोत, असे ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com