Konkan News : मोफत एसटीच्या लाभासाठी मतदान कार्डाची मागणी : राजकीय पक्षांची नवी खेळी

St Mahamandal Bus : आगामी निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी राजकीय पक्षांनी नवीन खेळी सुरू केल्याची चर्चा आहे.
St Mahamandal Bus News
St Mahamandal Bus NewsSarkarnama

Thane Politics : आगामी निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी राजकीय पक्षांनी नवीन खेळी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त काढला आहे. कारण मुंबई (Mumbai) - ठाण्यातून चाकरमानी हा दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात (Konkan) जात असतो. गावी जाण्यासाठी आजही चाकरमानी एसटीला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. त्यानुसार महिनाभर आधीच आरक्षण करण्यासाठी धाव घेत असतात. त्यात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहेत. त्यात राजकीय पक्षांकडून देखील मोफत बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी आधारकार्ड आणि मतदानकार्ड घेतले जात आहे.

मतदान ओळखपत्रच्या माध्यमातून आपला मतदार ओळखता यावा, यासाठी राजकीय पक्षांच्या वतीने ही नवीन शक्कल लढवली जात आहे. गणेशोत्सव सण म्हंटल की, समोर येतात ते चाकरमानी. गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्यासाठी महिनाभर आधीपासून त्यांची धावपळ सुरू असते. एसटी, रेल्वे गाड्यांची बुकिंग करणे, गणपतीच्या पूजेसाठी साधन सामग्री खरेदी करणे, आरसा यासाठी लगबग सुरू झाली आहे.

St Mahamandal Bus News
Mp Imtiaz Jalil News : ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याची इम्तियाज यांनी घेतली शपथ..

त्यात यंदाच्या वर्षी ठाणे (Thane) विभागातून कोकणात जाण्यासाठी ग्रुप बुकिंगसह प्रवासी बुकिंग सुरू करण्यात आले. तर, ठाणे एसटी विभागाने देखील यंदाच्या वर्षी १ हजार ५०० बसचे नियोजन केले आहे. त्यात आतापर्यंत ७०० च्या आसपास बस फुल्ल झाल्या आहेत. त्यातही ग्रुप बुकिंगला अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे. अशातच दुसरीकडे कोरोनानंतर विविध राजकीय पक्षांकडून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी चाकरमानी देखील आता मोफत प्रवास करण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या एसटीचे तिकीटही वाढले असल्याने प्रवाशांचा देखील या मोफत सेवाला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार दिसतो आहे. वागळे इस्टेटपासून ते अगदी दिव्या पर्यंत सर्वच ठिकाणी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचे बुकींगही सुरू झाले आहे. यामध्ये शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे पदाधिकारी सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मनसेकडून (MNS) देखील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी मोफत प्रवासाची सेवा देऊ केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर चाकरमान्यांच्या बुकिंसाठी रांगा लागण्यास सुरूवात झाली असल्याचे दिसत आहे.

St Mahamandal Bus News
Beed NCP Sabha News : शरद पवारांचा इशारा अजितदादांनी घेतला मनावर ; बीडच्या सभेचा 'Teaser' लाँच; पण...

राजकीय पक्षांकडून मोफत प्रवासासाठी पूर्वी आधारकार्ड स्वीकारण्यात येत होते. यंदाच्या वर्षी आधारकार्ड बरोबर मतदार ओळखपत्र देखील घेण्यात येत आहे. हे पुरावे सादर केल्यानंतर त्या चाकरमान्याची माहिती राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडे संकलित केली जात आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका किंवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तुम्हाला आम्ही मोफत सेवा देतो, मग आम्हाला आमच्या नेत्याला मत द्या असे देखील सांगितले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे.

दरवर्षी कोकणात जाण्यासाठी गाड्या सोडण्यात येत आहेत. यावेळी केवळ आधारकार्ड घेवून सीट आरक्षणाचे कुपन देण्यात येत होते. त्यामध्ये अनेकदा आपल्या मतदार क्षेत्रातील नागरिकासह बाहेरच्या मतदार क्षेत्रातील नागरीकाला देखील जागा मिळत होती. त्यामुळे आपला मतदार कोण हे ओळखणे कठीण होत होते. त्यामुळे यंदा आधारकार्डासोबतच मतदान ओळखपत्र देखील घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in