अमित शहांच्या फोननंतर पोलिसांनी राणेंना सोडले!

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची तब्बल ९ तास पोलिसांनी चौकशी केली.
Narayan Rane- NItesh rane
Narayan Rane- NItesh rane Sarkarnama

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सॅलियन आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची शनिवारी मालवणी पोलिसांनी चौकशी केली. त्यांना तब्बल ९ तासानंतर पोलिसांनी सोडले. यानंतर राणे यांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मला शेवटी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना फोन करावा लागला, त्यानंतर पोलिसांनी आम्हला सोडले.

राणे म्हणाले, मला दोन दिवसापूर्वी मलवणी पोलिस स्टेशनमधून नोटीस आली होती. आपले म्हणणे सांगण्यासाठी आपण पोलिस स्टेशनला यावे, असे सांगितले होते. दिशा सॅलियनच्या आईने तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी बोलावले होते. सॅलियनने आत्महत्या केली नसून तीची हत्या केली हे आम्ही सांगितले होते. दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी फेडणेकर गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली होती. आम्हाला ९ तास पोलिस स्टेशनाला बसवले. आम्ही वारंवार सांगत होतो, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे.

Narayan Rane- NItesh rane
भाजप करणार महाविकास आघाडीची रस्त्यावर कोंडी

तरीही पोलिसांनी ऐकले नाही. शेवटी मला अमित शहा यांना फोन करावा लागला. त्यांतर आम्हाला बाहेर सोडले. मी सगळी माहिती दिली. सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका म्हणून मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, असा आरोपही राणे यांनी केला. हे मी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी माझे हे म्हणणे घेतले नाही. दिशाची केस दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असेही राणे म्हणाले.

नारायण राणे यांना अटक झाली होती तेंव्हा त्यांचा राजीनामा घेतला नाही असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर राणे म्हणाले, दाऊदशी संबंध आहे, म्हणून आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा मागत आहोत. आमचा आवाज कोणिही दाबू शकत नाही. दरम्यान, राणे पिता-पुत्र आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समर्थकांसह मालवणी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना आवरले. नितेश राणे यांना गुरुवारी (ता.३) आणि नारायण राणे यांना शुक्रवारी (ता.४) हजर राहण्यास पोलिसांनी सांगितले होते. मात्र, विधानसभा सत्र सुरू असल्यामुळे दोघांनी शनिवारी हजर राहणार असल्याचे वकिलाकडून कळवले. दिंडोशी सत्र न्यायालयाने दोघांना १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.

Narayan Rane- NItesh rane
काळा पैसा पांढरा करण्यात शिवसेनेच्या जाधवांनी भुजबळांनाही मागे टाकलेय!

दरम्यान, राणे पितापुत्रांची नऊ तासांहून अधिक काळ पोलिसांनी चौकशी केल्याने तो चर्चेचा विषय झाला. केंद्रीय मंत्र्याला पोलिस ठाण्यात इतका वेळ बसवून ठेवण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. या साऱ्या प्रकाराबद्दल त्यांचे वकिल सतिश मानेशिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राणेंना बसवून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस त्यांच्याकडे कसले पुरावे मागत आहेत, असा सवाल त्यांनी केला. महिला आयोगाने आदेश दिल्यानंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशीला जाण्याआधी नितेश राणे यांनी ट्विट करत तुम्ही सुरवात केली असली तरी शेवट आम्ही करू, असे ट्विट करत आव्हान दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in